Astrology : आज मालव्य योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार लाभच लाभ, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Panchang 21 September 2024 : आज शनिवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी मालव्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 21 September 2024 : आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी चंद्र वृषभ राशीत जाणार असून शनी स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे षष्ठ राजयोग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला चतुर्थी तिथीचं श्राद्ध केलं जातं.
श्राद्ध पक्षाच्या चौथ्या दिवशी षष्ठ राजयोगासोबत हर्षन योग, मालव्य योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आज वाढलेला दिसेल, ज्यामुळे त्यांची कामं सहज पूर्ण होतील. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर आज शनिदेवाच्या कृपेने परत येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे, सहकाऱ्यांच्या मदतीने ऑफिसची कामं लवकर पूर्ण होतील. आज व्यावसायिकांना चांगला नफा होईल. तुम्हाला प्रत्येक पावलावर कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनातील तणावापासून मुक्त राहाल. आज व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल आणि भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्यांना आज त्यांच्या अधिका-यांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळेल. तुमच्या मुलांचे भविष्य लक्षात घेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. आज नशिबाची साथ मिळाल्यास अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. आज तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा सहज पूर्ण करू शकाल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या वडिलांच्या मदतीने आज चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लव्ह लाईफमध्ये आहेत ते आज आपल्या प्रियकराबद्दल कुटुंबातील सदस्यांना सांगू शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्याला मान्यता मिळेल आणि लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे. आज व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि व्यवसायात तेजी येईल. या राशीचे नोकरदार आपल्या सहकाऱ्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल, ज्यामुळे ते इतरांना आर्थिक मदत करू शकतील. आज नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची संधीही मिळेल. जर तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावर मतभेद असतील तर आज ते संभाषणातून सोडवले जातील आणि नातं अधिक घट्ट होईल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज प्रत्येक कामात भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या आरोग्याची चिंता करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल. आज व्यवसायात चांगला नफा मिळाल्यास तुम्ही इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना करू शकता. आज तुम्ही तुमच्या आईसाठी ऑनलाइन काहीतरी खरेदी करू शकता. विशेष पाहुण्यांच्या आगमनाने घरात नवीन पदार्थांचा आस्वाद घेतला जाईल आणि मुलं खूप आनंदी दिसतील. संध्याकाळी धार्मिक कार्यात व्यस्त असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...