एक्स्प्लोर

Astrology : आज ध्रुव योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ, करा 'हे' सोपे उपाय

Panchang 20 April 2024 : आज ध्रुव योग, त्रिपुष्कर योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मेष राशीसह 5 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Today 16 April 2024 : आज, शनिवार, 20 एप्रिल रोजी चंद्र कन्या राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी ध्रुव योग, त्रिपुष्कर योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष (Aries Today Horoscope)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. मेष राशीच्या लोकांचं मन आज स्थिर असेल आणि तुम्ही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. नोकरदार लोक आज कामाप्रती पूर्णपणे समर्पित असतील. अनेक प्रभावशाली लोकांशी तुमची ओळख वाढेल. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगले लाभ मिळतील आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खर्च करू शकाल. अविवाहित लोकांना खास व्यक्ती भेटू शकते. आज जवळच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील आणि घरगुती कामं चांगल्या प्रकारे पूर्ण होतील.

मेष राशीसाठी शनिवार उपाय : शनिदेवावर मोहरीचं तेल अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ 'ॐ ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:' या मंत्राचा जप करा.

कर्क (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आज सुधारेल. आजचा दिवस तुमच्यासाठी पैशांच्या बाबतीत खूप चांगला असू शकतो. आज व्यावसायिकांना व्यवसायात नवीन योजना अंमलात आणाव्या लागतील, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल आणि व्यवसायाची विश्वासहार्ताही वाढेल. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या दैनंदिन कामात कोणत्याही अडचणी येणार नाही, तुमच्या पदरी यश पडेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील, त्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. लव्ह लाईफ सुखाचं असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

कर्क राशीच्या लोकांसाठी शनिवारचा उपाय : मानसिक शांतीसाठी दर शनिवारी पीठ, काळे तीळ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. तसेच, मोहरीच्या तेलापासून बनवलेल्या वस्तू गरीब आणि गरजूंना खायला द्या आणि त्यांची सेवा करा.

कन्या (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कन्या राशीच्या लोकांना आज कुटुंब आणि नातेवाईकांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने बहरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. आज तुमचे खर्च नियंत्रणात राहतील, जास्त खर्च होणार नाही. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. नोकरदार लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते, तुम्ही आज नवीन नोकरी देखील शोधू शकतात. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. अनुभवी लोकांच्या मदतीने अनेक समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि मित्रांसोबतही तुमचे संबंध चांगले राहतील.

कन्या राशीसाठी शनिवारचा उपाय : शत्रू आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाकरीवर मोहरीचे तेल मिसळून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुमच्यासाठी आज प्रगतीचे आणि यशाचे दार खुले होईल. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल आणि धीराने सर्व गोष्टी हाताळाल. शनिदेवाच्या कृपेने आज तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची स्वप्नं साकार होण्यास मदत होईल. व्यावसायिकांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात, परंतु तुम्हाला या संधींचा योग्य वापर करावा लागेल. व्यावसायिकांना व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगती करण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि तुम्ही बक्कळ पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. पती-पत्नी एकमेकांशी भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जातील, ज्यामुळे दोघांमधील परस्पर प्रेम वाढेल.

धनु राशीसाठी शनिवार उपाय : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी एका भांड्यात मोहरीच्या तेलात एक नाणं टाका आणि त्यात तुमचं प्रतिबिंब पहा. त्यानंतर ते तेल गरीब व्यक्तीला द्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात वाटीत ठेवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget