Astrology : आज हर्षण योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, होणार चौफेर धनलाभ
Panchang 17 May 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना आज आर्थिक लाभ होईल आणि त्यांच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 17 May 2024 : आज, शुक्रवार, 17 मे रोजी सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत जाणार आहे. याशिवाय आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी असून या दिवशी हर्षण योग, लक्ष्मी नारायण योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ, कन्यासह 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज जे काही निर्णय घेतील, त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळतील. आज प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण होईल. व्यवसायात लाभासाठी केलेल्या योजना आज पूर्ण होऊ शकतात आणि त्यातून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये समाधान मिळेल आणि त्यांच्या आर्थिक जीवनात अनपेक्षित लाभही मिळतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. सासरच्या लोकांशी काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि प्रत्येकजण आपापली कामं शहाणपणाने करेल. कुटुंबात विशेष पाहुण्याचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे घरातील वातावरण आनंददायी होईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. तुम्हाला सकाळी एकापाठोपाठ एक अनेक चांगल्या बातम्या मिळू शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने आज तुम्ही पैसे कमवू शकाल आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज व्यवसाय करणाऱ्यांकडे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वेळ आणि शक्ती असेल, ज्याचा योग्य दिशेने वापर करून तुम्ही चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि उत्पन्नाचे चांगले स्त्रोत देखील त्यांना मिळतील. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उपयोगी पडेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज देवी लक्ष्मीच्या कृपेने चांगले पैसे मिळतील आणि बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. नशिबाने साथ दिल्याने तुमची सर्व अपूर्ण कामं पूर्ण होतील. आज तुम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रात चांगलं यश मिळेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारू शकेल. नोकरदार लोक त्यांच्या कामाने सर्वांना प्रभावित करतील, यामुळे पगार तसेच प्रभाव वाढेल. अविवाहित लोकांना आज त्यांच्या स्वप्नांचा जोडीदार मिळू शकतो, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही चांगले राहतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज मालमत्तेशी संबंधित मोठे व्यवहार करण्याची संधी मिळू शकते आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल, यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्यही मिळेल. नोकरदार लोक उत्पन्न वाढीसाठी आणि करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी नोकरीमध्ये बदल करण्याची योजना आखतील, ज्यामध्ये त्यांना लवकरच यश मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि तुम्हाला धार्मिक कार्यातही रस असेल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज काही प्रवासातून चांगले लाभ मिळतील आणि तुमच्या सभोवतालचं वातावरणही सकारात्मक राहील. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळतील, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि तुमचं करिअर वेगाने प्रगती करेल. जे स्वत:चा व्यवसाय चालवतात त्यांना कोणत्याही व्यावसायिक व्यवहारातून चांगला नफा मिळेल आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना टफ फाईट देतील. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल आणि बचत करण्यातही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि आदर असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: