Rajyog : पुढचे 3 दिवस सुखाचे; विपरीत राजयोगामुळे 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, नवीन नोकरीसह धनलाभाचे योग
Vipreet Rajyog : सूर्याच्या मार्गक्रमणामुळे बनत असलेल्या विपरीत राजयोगामुळे अनेक राशींचं नशीब पालटणार आहे. नोकरी-व्यवसायात लाभासह तुम्हाला धनलाभाचेही योग आहेत.
Vipreet Rajyog : गुरू आणि सूर्याच्या युतीमुळे तयार झालेला विपरीत राजयोग फार शुभ मानला जातो. 14 मे रोजी सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. देवगुरु बृहस्पतिसोबत सूर्य उपस्थित आहे. यासोबतच शुक्रही अस्त अवस्थेत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. पण हा राजयोग 19 मे रोजी शुक्राच्या राशी बदलानंतर संपणार आहे.
अशा स्थितीत पुढील 3 दिवसांत काही राशींचं नशीब चमकू शकतं. विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला एक प्रकारे लॉटरीच लागू शकते. नेमका कोणत्या राशींना विपरीत राजयोगाचा फायदा होईल? जाणून घेऊया.
मीन रास (Pisces)
मीन राशीवर विपरीत राजयोगाचा कोणताही अशुभ प्रभाव पडणार नाही, या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शेअर मार्केट, सट्टा बाजार इत्यादीद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आरोग्यही चांगलं राहील. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना या काळात यश मिळेल. कुटुंबाची साथ तुमच्या पाठीशी राहील, तुम्हाला त्यांची चांगली मदत लाभेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांवर विपरीत राजयोगाचा कोणताही वाईट परिणाम पडणार नाही. विपरीत राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि संपत्ती वाढेल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील, प्रत्येक कामात यश मिळेल.
तूळ रास (Libra)
विपरीत राजयोग या राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. संशोधन करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आर्थिक स्थितीही चांगली असू शकते. प्रदीर्घ समस्याही आता संपू शकतात. मालमत्तेतील कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: