Astrology : आज रुचक योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींना लाभच लाभ, अडकलेली कामं देखील लागणार मार्गी
Panchang 11 June 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज हनुमंताची कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 11 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, मंगळवार, 11 जून रोजी चंद्र कर्क सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यासोबतच मंगळ त्याच्या मूळ राशीत, म्हणजेच मेष राशीत असणार आहे, ज्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होईल. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक सरकारी क्षेत्रात काम करतात त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी बदली मिळू शकते आणि त्यांचं उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्य केल्याने आज तुमच्यासह तुमच्या कुटुंबाचा मान वाढेल. नोकरदार लोकांना त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे कामात यश मिळेल. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. आज व्यावसायिकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात आज नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. हनुमंताच्या कृपेने सर्व अपूर्ण कामं पूर्ण होऊ लागतील आणि कामात चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. नोकरदार लोकांना आज मोठ्या कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर आज परत येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्रात तुमची चांगली प्रगती होईल. तुम्ही भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्याल आणि तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील आणि तुम्ही एकत्र काही मालमत्ता खरेदी करू शकता.
मकर रास (Capricorn)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. नोकरदारांना आज त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील, आज कामावर तुमची प्रशंसा होईल. तुमच्या कुटुंबाशी तुमचे संबंध अनुकूल राहतील. तुम्ही अविवाहित असाल तर आज तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज आयुष्यात सुख आणि मानसिक शांती दोन्ही मिळेल. मुलांच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या यशामुळे तुम्ही आनंदी व्हाल. घरातून बाहेर पडताना आई आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या, यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला लव्ह लाईफमध्ये तुम्ही आनंददायी क्षणांचा अनुभव घ्याल, प्रियकरासोबत रोमँटिक डिनरवर जाऊ शकता. आजचा दिवस देव दर्शन आणि शुभ कार्यात व्यतित होईल. तुम्ही मित्रांसोबत सहलीला जाण्याचा विचार कराल. व्यावसायिक चांगला नफा कमावतील.
मीन रास (Pisces)
आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील, आजचा दिवस प्रगतीचा असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात अधिकाऱ्यांची मदत लाभेल. भावाच्या सल्ल्याने केलेलं काम पूर्णत: यशस्वी होईल. तुम्ही नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. जर कौटुंबिक संबंधांमध्ये काही कटूता चालू असेल तर ती आज संपेल. कामावर नोकरदार लोकांचा प्रभाव वाढेल आणि ते नवीन नोकरीच्या शोधातही असू शकतात. संध्याकाळी मित्रांसोबत मजामस्ती चालेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: