Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींवर राहणार बाप्पाची विशेष कृपा, सुख-समृद्धीत होणार वाढ
Panchang 09 July 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मेषसह 5 राशींवर आज बाप्पांची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 09 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज मंगळवार, 9 जुलै रोजी चंद्र सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी अंगारक योग, रवि योग, सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि आश्लेषा नक्षत्र तयार होत आहे, ज्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आज कोणत्या 3 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मेष राशीचे लोक आज प्रिय व्यक्तींसोबत मोकळेपणाने जीवनाचा आनंद घेतील आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतील. विद्यार्थी कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात यश मिळेलच आणि वडिलांचं, शिक्षकांचं सहकार्यही मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आजपासून करिअर सुरू करण्याची संधी मिळेल. त्याच वेळी, व्यावसायिक आज सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असतील आणि चांगला नफा देखील कमावतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात बुडालेले दिसाल, यामुळे तुमचं नातं मजबूत होईल. तुमच्या मुलांचं काम पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमची अनेक कामं पूर्ण होतील.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कर्क राशीचे लोक आज स्वतःसाठी वेळ काढतील आणि इतरांशी मोकळेपणाने बोलू शकतील. कुटुंबात बराच काळ कोणताही वाद सुरू असेल तर तो आज घरातील ज्येष्ठांच्या मदतीने संपुष्टात येईल. भावांच्या मदतीने घरातील सर्व महत्त्वाची कामं सहज पूर्ण होतील आणि विरोधकांपासून सुटकाही मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे, बाप्पाच्या कृपेने तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. नोकरदार लोकांची आज करिअरमध्ये चांगली प्रगती होईल, त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज बाप्पाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचा मान-सन्मानही वाढेल. जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिक आज आपली क्षमता दाखवू शकतील, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल आणि आर्थिक लाभही होईल. तुम्हाला तुमची जमीन आणि वाहन खरेदी करायचं असेल तर ही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. बऱ्याच दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या पालकांसोबत वेळ घालवण्याची आणि महत्त्वाची चर्चा करण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांच्या नात्याची चर्चा आज पुढे येऊ शकते आणि संध्याकाळचा वेळ काही सामाजिक कार्यात जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :