Astrology : WhatsApp च्या वापरावरुन ओळखा तुमचा स्वभाव; ज्योतिषशास्त्रानुसार वाचा मनोरंजक माहिती
Astrology : नुकत्याच एका इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपच्या वापरावरुन तुमचा स्वभाव नेमका कसा असेल हे सांगण्यात आलं आहे.

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशींवरुन (Zodiac Signs) तसेच, अंकशास्त्रावरुन (Ank Shastra) त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे, सोशल मीडियावर देखील अनेक गोष्टींमधून व्यक्तीच्या स्वभावाचे अनेक गुण सांगितले जातात. नुकत्याच एका इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपच्या (Whatsapp) वापरावरुन तुमचा स्वभाव नेमका कसा असेल हे सांगण्यात आलं आहे. हे काही गमतीशीर मुद्दे आहेत. याचा व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही. याच संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
Whatsapp वापरावरुन इतरांचा 'असा' ओळखा स्वभाव :
जे लोक डीपी बदलतच नाहीत - हे लोक खूप साधे, सरळ आणि चांगल्या स्वभावाचे असतात.
वारंवार डीपी बदलणारे - असे लोक फार चिडक्या स्वभावाचे असतात. तसेच, हे लोक नेहमीच गोंधळात असतात.
दररोज गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज पाठविणारे - हे लोक फार मनमोकळे, दिलदार आणि लोकांना खुश ठेवणारे असतात.
कधीच स्टेटस न ठेवणारे - हे लोक साधे, सरळ, व्यस्त आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणारे असतात.
कधी कधी स्टेटस ठेवणारे - असे लोक शांत, समाधानाने जगणारे आणि नियोजनबद्ध असतात.
दररोज स्टेटस ठेवणारे - हे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात. तसेच, यांना कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येतो.
नेहमी एका वेळी 50-40 स्टेटस ठेवणारे - असे लोक फार भरकटलेल्या आणि अस्थिर मनोवृत्तीचे असतात.
लास्ट सीन आणि रिड लिस्टच ऑफ करणारे - हे लोक फार चतुर, गुप्त स्वभावाचे आणि कपट्या वृत्तीचे असतात.
नोटिफिकेशनमध्ये मेसेज वाचून रिप्लाय न करणारे - हे लोक फार महाचालाक तसेच, राजकारणी वृत्तीचे असतात.
ग्रूपमध्ये हजारो मेसेजेस अनरीड करणारे - हे लोक फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे, शांत आणि नियोजनबद्ध असतात.
फक्त मीम्स आणि जोक्स शेअर करणारे - हे लोक फार मस्तीखोर, आनंदी आणि नेहमी मजेत राहणारे लोक असतात.
नेहमी 'Typing...' दिसणारे पण मेसेज न पाठवणारे - हे लोक फार कन्फ्युस्ड असतात. आपल्याला काय मेसेज लिहायचा याबाबत सतत यांच्या डोक्यात गोंधळ सुरु असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















