Astro Tips : उलटं स्वस्तिक कधी आणि कुठे काढतात? तुमच्या आर्थिक परिस्थितीशी थेट आहे संबंध...
Astro Tips : हिंदू धर्मग्रंथांनुसार, कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी घरात किंवा कार्यालयात स्वस्तिकचं चिन्ह बनवणं फार शुभ मानलं जातं.

Astro Tips : हिंदू धर्मग्रंथांनुसार, कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी घरात किंवा कार्यालयात स्वस्तिकचं चिन्ह बनवणं फार शुभ मानलं जातं. मग तो उपवास असो, पूजा किंवा हवन. स्वस्तिकचं चिन्ह काढल्याशिवाय शुभ कार्य अपुरं मानलं जातं. स्वस्तिकमुळे घरात सुख-शांती टिकून राहते अशी मान्यता आहे. पण, काही ठिकाणी तुम्ही उलटा स्वस्तिक काढलेला देखील पाहिलं असेल. याचा अर्थ नेमका काय असतो. आणि तो का काढला जातो? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
उलटा स्वस्तिक का काढतात?
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा व्यक्तीला कठीण समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा उलटा स्वस्तिक काढतात. आणि जेव्हा त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तेव्हा त्याच ठिकाणी सरळ स्वस्तिक काढला जातो. ही एक प्रकारे देवापुढे आभार मानण्याची देखील एक पद्धत आहे. यामुळे व्यक्तीवरचं संकट टळलं असा देखील एक प्रकारे संकेत मिळतो.
नकारात्मक ऊर्जा दूर होते
धार्मिक मान्यतेनुसार, असं म्हणतात की, उलटा स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच, घरावर येणारं संकट दूर होते. उलट्या स्वस्तिकला कधीच घरात काढलं जात नाही. तर, जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्रा जातो, किवा एखाद्या पवित्र ठिकाणी, मंदिरात जातो. तेव्हा असं चिन्ह काढलेलं दिसतं.
'या' गोष्टी चुकूनही विसरु नका
जर तुम्ही एखाद्या पवित्र धार्मिक स्थळी उलटा स्वस्तिक काढणार असाल तर तो नेहमी साफ आणि स्वच्छ, सुंदर अशा ठिकाणी काढा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल, त्या जागेवर कोणी पाय ठेवला नसेल अशा जागी उलटा स्वस्तिक काढा. तसेच, जेव्हा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी सरळ स्वस्तिक काढायला विसरु नका. जर तुम्ही असं नाही केलंत तर घरात संकट यायला जास्त वेळ लागणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















