(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aries Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मेष राशीसाठी पुढचे 7 दिवस सोन्यासारखे; पावलोपावली मिळणार नशिबाची साथ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Aries Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. तुम्हाला नवीन आठवड्यात सर्वच गोष्टींमध्ये अपेक्षित यश मिळेल.
Aries Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : राशीभविष्यानुसार, मेष राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Horoscope)
तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवाव. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.
मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)
ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील.
मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे किंवा आपण घराची दुरुस्ती करण्याचा विचार करू शकता. शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठीही हा आठवडा शुभ राहील. व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणांहून निधी उपलब्ध होईल. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. काही लोकांना कर्जापासून मुक्ती मिळेल.
मेष राशीचे आरोग्य (Aries Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावणार नाहीत. मेष राशीच्या वृद्धांना या आठवड्यात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. गरोदर महिलांनी खेळांमध्ये वैगेरे भाग घेणं टाळावं. तुम्ही रोज फिरायला जा, यामुळे तुम्ही फिट राहाल. या आठवड्यात जड वस्तू उचलणं टाळावं, अन्यथा ते महागात पडू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :