Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीसाठी नवीन वर्ष भाग्याचे; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Aquarius Yearly Horoscope 2025 : नवीन वर्ष 2025 कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर, शिक्षण, प्रेम, कुटुंब, आरोग्य इत्यादी बाबतीत कसं असेल? जाणून घ्या कुंभ वार्षिक राशीभविष्य
Aquarius Yearly Horoscope 2025 : करिअर आणि व्यवसायाव्यतिरिक्त, येणारं नवीन वर्ष प्रेम जीवनाच्या दृष्टीने कसं असेल हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आर्थिक स्थिती, आरोग्य नातेसंबंध आणि प्रेम प्रकरणांच्या बाबतीत कसं राहील? कुंभ राशीच्या लोकांचं वार्षिक राशीभविष्य 2025 (Aquarius Yearly Horoscope 2025) जाणून घेऊया.
कुंभ राशीचे करिअर (Aquarius Yearly Career Horoscope 2025)
या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगला राहील. या दरम्यानच तुमची प्रगती होईल. कारण शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा 29 मार्चला संपणार आहे. कर्म आणि सप्तम घरातून शनीची दृष्टी दूर होईल, जे तुमच्यासाठी शुभ असेल. पण राहु राशीत असल्यामुळे काही संघर्ष सहन करावा लागू शकतो. पण 2024 च्या तुलनेत 2025 शुभ असेल. या वर्षी तुम्हाला सन्मानही मिळेल.
कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Yearly Wealth Horoscope 2025)
आर्थिक स्थितीच्या दृष्टीने नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण शुक्र चढत्या स्थानी आणि सूर्य देव लाभ स्थानात उपस्थित असेल. बुध दहाव्या घरात राहील. जे करिअरमध्ये स्थिरता देईल. त्यामुळे या वर्षी तुमचे पैसे वाचतील.
कुंभ राशीच्या मुलांचे शिक्षण (Aquarius Yearly Education Horoscope 2025)
या वर्षी विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, जानेवारी ते मार्च हे महिने त्यांच्यासाठी सामान्य असतील. पण मार्च ते मे दरम्यानचा काळ चांगला आहे, या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळू शकतं. तसेच परदेशात शिक्षणासाठी व्हिसाही मिळू शकतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिना शुभ राहील, पण या वर्षी तुम्हाला आळस सोडावा लागेल. तसेच तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर राहावं लागेल.
कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन आणि प्रेमसंबंध (Aquarius Yearly Love Horoscope 2025)
29 मार्च रोजी राहू आणि शनीचा संयोग होईल, ही युती 18 मे पर्यंत कायम राहील. त्यामुळे या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच प्रेमसंबंधही तुटू शकतात, म्हणून तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवा.
कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Yearly Health Horoscope 2025)
2025 मध्ये कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ-उतार दिसतील. या वर्षी तुम्ही खूप प्रवास करू शकता, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं, अन्यथा त्रास होऊ शकतो. मे महिन्यात राहु ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात प्रवेश करेल, त्यामुळे तुमचं आरोग्य थोडं कमजोर राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: