(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aquarius Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : कुंभ राशीसाठी पुढचे 3 दिवस कठीण काळाचे; या आठवड्यात गुंतवणुकीदरम्यान सावधान, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Aquarius Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला पैशाशी संबंधित अडचणी जाणवतील. परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व समस्या सोडवल्या जातील.
Aquarius Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडा आव्हानात्मक असेल, आठवड्याच्या पहिल्या भागात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात तुम्हाला थोडी दुखापत होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला लव्ह लाईफमध्ये समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रियकराशी बोलवा आणि समस्यांचं निराकरण करा. जोडीदाराला पर्सनस स्पेस द्या, त्याच्या भावनांचा आदर करा. जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला अचानक भेटायला येऊन आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.
कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)
नोकरदारांनी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील. राजकारणी, चित्रकार, लेखक, आचारी आणि वकील यांचं कौतुक होईल, तर बँकर्स आणि अकाऊंटंट कामानिमित्त स्थलांतरित होऊ शकतात. जे नोकरी बदलण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी जॉब पोर्टलवर आपला प्रोफाईल अपडेट करावा, एक-दोन दिवसांत तुम्हाला अनेक ठिकाणांहून मुलाखतीसाठी फोन येतील. काही व्यावसायिकांना परवान्याशी संबंधित समस्या उद्भवत असतील, तर त्यांनी लवकरात लवकर सोडवाव्या.
कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं राहील, अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. जे लोक परदेशात सुट्टीची योजना आखत आहेत ते फ्लाइट आणि हॉटेल दोन्ही बुक करू शकतात. उद्योजकांना त्यांचा व्यवसाय पुढील स्तरावर नेण्याच्या चांगल्या संधी मिळतील. काही भाग्यवान व्यावसायिकांना आठवड्याच्या अखेरदी बलाढ्य नफा मिळेल.
कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)
नवीन आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असेल. या आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल, परंतु चांगला आहार, प्रथिने आणि पोषक तत्वांनी युक्त अन्न घ्या. खेळताना मुलांना दुखापत होऊ शकते. महिलांना मायग्रेन, कान आणि डोळ्यांशी संबंधित त्रास, पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो. या आठवड्यात तुम्ही जिम किंवा योगा क्लास लावू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: