Akola : गेल्या आठ दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण; आवकही घटली, तुरीचे दर काय?
Tur Market Price : गेल्या आठ दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट 1660 रुपयांनी घसरण झालीये.
अकोला: गेल्या आठ दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट 1660 रुपयांनी घसरण झालीये. तर गेल्या आठ दिवसात तुरीचे दर सतत घसरले आहेत. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला 8085 रुपये इतका कमाल भाव मिळतोय. तर सरासरी भाव हा 8 हजार रुपयांच्या जवळपास आहे. मागील आठ दिवसात नव्या तुरीच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाल्याने आवकही घटली आहे. त्यामुळे या हंगामात देखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत तूर घरात साठवून ठेवण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुरीची आवक वाढण्याची शक्यता कृषी बाजार समितीने व्यक्त केलीये. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी भाव 7900 रुपये प्रति क्विंटल मिळतो आहे.
तुरीच्या भावातील या आठवड्यात झालेले चढ-उतार
तारीख किमान कमाल
12 डिसेंबर 7900 9745
13 डिसेंबर 7900 9800
14 डिसेंबर 7500 9600
17 डिसेंबर 6000 8000
18 डिसेंबर 7000 7875
19 डिसेंबर 7000 8670
20 डिसेंबर 7000 8205
21 डिसेंबर 6400 8505
खासगी व्यापाऱ्यांकडून 4000 रुपये प्रतिक्विंटल दरानं सोबायीनची खरेदी
राज्यात काही ठिकाणी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तरी सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन वाहून नेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाहतुकीचा खर्च न परवडल्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकत आहेत. राज्य व केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, तेवढा दर मिळत नाही. याच मुद्यावरुन किसान सभेनं टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या: