![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, 'या' योजनेतून शेतकऱ्यांना देणार पाठबळ
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे.
![मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, 'या' योजनेतून शेतकऱ्यांना देणार पाठबळ PM Kisan Samman Yojana Modi-government likely to give more cash to farmers before loksabha election 2024 मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, 'या' योजनेतून शेतकऱ्यांना देणार पाठबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/3fa39fe087e7272225001e1309e157d71677481392291455_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Kisan Yojana, Modi government, pm modi, farmers , farmers, agriculture news
शेतकरी, मोदी सरकार, पीएम किसान, पीएम किसान सन्मान निधी योजना
Modi Government: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
PM किसान योजनेची रक्कम सरकार 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. सरकार ही मदत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आता या योजनेच्या रकमेत मोदी सरकार वाढ करण्याची शक्यता आहे. ही रक्कम 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दिली जाणारी 6,000 रुपयांची रक्कम वाढवून 8,000 रुपये करण्याचा विचार करत आहे. या मुद्द्यावर चर्चेत आलेल्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. जर ही योजना मंजूर झाली, तर चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 60,000 कोटी रुपयांच्या कार्यक्रमासाठी तरतूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर सरकारला 20,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागेल. दरम्यान, याबाबत अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला आहे.
अर्थसंकल्पात होणार घोषणा
1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत सुरू केली आहे.
2019 मध्ये या योजनेची केली होती घोषणा
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे 4000 रुपये देण्यात आले होते. 2019 मध्ये सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षालाही याचा फायदा झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष पुन्हा सत्तेत आला.
महत्त्वाच्या बातम्या:
'या' योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला शेतकऱ्याला मिळणार तीन हजार रुपये, अशी करा नोंदणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)