एक्स्प्लोर

Ajit Pawar : राज्यात 45 दिवसात 137 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अजित पवारांचा सरकारवर निशाणा, अब्दुल सत्तारांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला.

Ajit Pawar on Farmers suicides : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 45 दिवसात राज्यात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicides) केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं पाहिजे. आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. तसेच पवार साहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण केलं, हे आपण पाहिलं असल्याचेही ते म्हणाले. 

मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही

मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेनं सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचं प्रतिनिधित्त्व करताना आत्महत्या होणं ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या असेही अजित पवार म्हणाले. सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुसान झालं आहे. त्यामुलं राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळं ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावं. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावं अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपये, तर फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत द्यावी

पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळं सरकारनं  पिकांसाठी हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु करण्याची परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पुढे जाईल असेही ते म्हणाले.

गोगलगायमुळं मराठवाड्यात सोयाबीनचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई द्यावी
 
मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर याठिकाणी गोगलगायमुळं कोवळ्या सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. उगवलेलं सोयाबीन गोगलगायनं खाल्ल्यानंतर नुकसानभरपाईची तरतूद नियमात नाही, त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. या सरकारला पीककर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पीककर्ज माफ केलं पाहिजे. कोसळलेल्या घरांच्या नुकसानभरपाईसह ओलाव्यामुळं भेगा पडलेल्या घरांचाही पंचनामा झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शाळा, शासकीय इमारतींचे देखील पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी अजित पवारांनी केली.
सोयाबीनचा प्रतिएकर खर्च 11 हजार 700 रुपये आहे. तर कापसाचा प्रतिएकर खर्च हा 11 हजार 570 रुपये येतो. असं असताना आताच्या सरकारनं हेक्टरी केवळ 13 हजार 600 रुपयांची  मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यान काय करावं? कसं जगावं? प्रपंच कसा चालवावा? असे सवालही अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget