Nandurbar cotton : नंदूरबार जिल्ह्यातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
नंदूरबार जिल्ह्यातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
Nandurbar cotton News : राज्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे (cotton crop) उत्पादन घेतले जाते. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी, कधी पिकांवर पडणारे रोग या अडचणींना तोड देत पिकांचं उत्पादन घ्यावं लागतं. अशातच आता नंदूरबार जिल्ह्यातील कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. आधीच विदर्भ ामि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
शेतकरी कापसाकडे नगदी पीक म्हणून पाहत असतो. मात्र, दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत असते. त्यामुळं उत्पादनात घट येते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे. अशातच आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्यानं पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
तत्काळ पंचनामे करुन मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
दरम्यान, ज्या ठिकाणी कापसाच्या मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्या ठिकाणच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी आष्टे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. मायबाप सरकारनं आता तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहून त्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करावेत हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच राज्यातील शेतकरी अतिवृष्टी झाल्यामुळं चिंतेत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुलं जनजीव निव्सकळीत झालं आहे. या पावसामुळं शेती पिकांचं देखील मोठे नुकसान झालं आहे. या संकटातून शेतकरी सावरत नाहीत, तोपर्यंत पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: