एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : सरकारचा मनमानी कारभार कधी थांबणार? हरभरा खरेदीच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

नाफेडनं अचानक हरभरा खरेदी बंद केली आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तत्काळी खरेदी सुरु करण्याची मागणी स्वाभिमानीनं केली आहे.

Ravikant Tupkar : अचानक नाफेडनं हरभरा खरेदी बंद केल्यानंतर विविध स्तरातून टीका होताना दिसत आहे. नाफेडनं हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. नाफेडनं खरेदी बंद केल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अशी अचानक खरेदी बंद करणं चुकीचं आहे. जर नाफेडनं तत्काळ खरेदी सुरु केली नाही तर रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) यांनी दिला.

नेमकं काय म्हणाले तुपकर

गेल्या आठ दिवसापासून नाफेडनं राज्यभरात शासकीय हरभरा खरेदी केंद्र अचानक बंद केली आहेत. त्यामुळं हजारोंच्या संख्येनं शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर माल घेऊन आले होते. त्यांच्या हानांसह ते शेतकरी खरेदी केंद्रावरच खरेदी होण्याची वाट बघत थांबले आहेत. त्यांच्या वाहनांचे भाडे तसेच सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अशी अचानक खरेदी बंद करणं अत्यंत चुकीचं आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सरकारकडून नेहमीच असे धोरण राबवून शेतककऱ्यांना वाऱ्यावर सोडले जातेय सरकारच्या अशा धोरणाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. मात्र, अचानक नाफेडनं खरेदी बंद केल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावरुन विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaDharashiv  Lok Sabha Elections 2024 : प्रवीण परदेशी कमळ चिन्हावर लढण्यास आग्रही : ABP MajhaRavikant Tupkar  Lok Sabha  : शंभर टक्के विजय शेतकऱ्यांच्या मुलांचा होणार : रविकांत तुपकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget