मोठी बातमी! पाऊस बंद झाल्याबरोबर सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार; कृषिमंत्री नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे

Akola: राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील जून, जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं कृषिमंत्री भरणे म्हणालेत.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे . शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे .कर्जमाफी, नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होत असताना सरकारवर दबाव वाढतोय . गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूरसह बीड धाराशिव लातूर हिंगोली जिल्हांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी हतबल झालाय .
"राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करू"
राज्यातील पावसाने उध्वस्त झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कृषिमंत्र्यांनी सांगितलं की, “राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.” दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं. त्यांनी आश्वासन दिलं की, यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना “गुड न्यूज” दिली जाईल.असं कृषिमंत्री भरणे म्हणालेत
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून तीन दिवसीय शिवारफेरीला सुरुवात झालीय. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल अकोल्यात आले होतेय. या तीन दिवसांत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील अकराही जिल्ह्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शिवार फेरीला भेट देणारायेत. शिवार फेरीत हे 43 वे वर्ष आहे. 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिक यावेळी पाहता येणारेय. 112 खरीप पिके, 27 भाजीपाला पिके, 59 फुल वर्गीय पिके असे एकूण 212 पिक वाण तथा तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पहावयास मिळणारायेत.
कृषी विद्यापीठातील रिक्त पदासंदर्भात सरकार ठोस निर्णय घेणार
दरम्यान, राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त पदास संदर्भात पुढच्या महिन्यात ते दोन महिन्यात सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचं कृषिमंत्री म्हणालेय. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून अकोला कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकारमधील मतभेदांची बातमी नुकतीच 'एबीपी माझा'ने दाखविली होतीय.तर जंगली जनावरांपासून पिकांना संरक्षणासाठी सरकार लवकरच बांबूंच्या कुंपणाची योजना आणणार असल्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणालेय. बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी मंत्री आणि प्रशासनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर थेट काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला.

























