(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खरीप पीक नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात, 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटी जमा
वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता पर्यंत 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना पीकविमा कवच स्वरूपात पीकविम्याचे 56 कोटी 15 लाख रुपये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक नुकसानीच कवच म्हणून खरीप हंगामा करिता पीक विमा शासन स्तरावर सुरू करण्यात आला. वाशिम जिल्हाभरातील 2 लाख 80 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन शेकडो कोटी रुपये विमा हफ्त्यापोटी बँकांकडे भरले, खरीप हंगामात अधिकत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा अधिक भरला होता. मात्र सततचा पाऊस आणि अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीन काढणीला आल्यानंतर शेतात अक्षरशः गुडघ्या इतके मानी साचले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांची शेती खरडून गेली होती.
बाधित शेतकऱ्याने नुकसानाची तक्रार केल्यानंतर पीकविमा कंपनी आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर निकषानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई म्हणून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जात आहे. पात्र ठरलेल्या अजूनही 66 हजार शेतकऱ्यांना पीकविमा मोबदल्याची प्रतीक्षा आहे. मात्र यामध्ये पीक कापणीपश्चात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना निधी उपलब्ध होताच टप्प्या टप्प्याने पीकविम्याची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार प्रथम स्वरूपात जरी काही शेतकऱ्यांच्या खात्यात कमी रक्कम प्राप्त झाली असली तरी दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यात जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात जून जुलै महिन्यात अल्प प्रमाणात पाउस पडला नसला तरी ऑगष्ट सप्टेंबर महिन्यात वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतात गुडघ्या पर्यंत पाणी साचल होत. यावेळी शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे वेळेत तक्रारी केल्या होत्या या तक्रारीच्या आधारे पिक विमा कंपनी आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर केला होता. बराच कालावधी उलटल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत आहे. आता पर्यंत 1.5 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात 56.15 कोटी रूपांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अजूनही 66 हजार शेतकरी पिक विमा मोबादाल्यापासून वंचित आहेत. निधी उपलब्ध होताच त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणर आहे.