IPCC Report : तापमान वाढीचा जगाला फटका बसणार, कृषी उत्पन्नात घट होऊन पुराचा धोका वाढणार
कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचे IPCC च्या अहवालातून समोर आले आहे. कृषी उत्पन्नात घट होऊन पुराचा धोका वाढणार असल्याचे सांगितले आहे.
IPCC Report 2022 : जगातील 3 अब्जांपेक्षा अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका बसणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज अर्थात IPCC च्या अहवालातून समोर आले आहे. तसेच तापमान वाढीचा कृषी क्षेत्राला फटका बसणार आहे. कृषी उत्पन्नात घट होणार असून, पुराचा धोका वाढण्याची भीती या IPCC च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालातून काही धक्कादायक निरक्षणे समोर आली आहेत.
सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत आहे. याचा फटाका सर्वच क्षेत्रांना सहन करावा लागत आहे. हवामान बदलाचा जगाला नेमका कसा फटका बसू शकतो याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तापमानात साधारणत: 1 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होईल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशियायी देशांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तांदूळ आणि मका उत्पादन घटणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे. त्याचा भारतातील सुमारे साडेचार कोटी नागरिकांना धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
तापमान वाढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासू शकते. जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात 10 ते 23 टक्के घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे कर्करोग, डेंग्यू, हिवताप यासारख्या आजारातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करम्यसाठी सर्वच देशांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व जगाला संकटांना सामोर जावं लागणार आहे.
तापमान वाढीमुळे आशिया खंडातील कृषी आणि अन्न प्रणालीवर मोठा परिणाम होणार आहे. भारतात तांदूळ उत्पादनात दहा ते तीस टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मक्याचे उत्पादन 25 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. एवढेच नव्हे, तर तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते. मुंबई परिसरात 2035 पर्यंत सुमारे अडीच कोटी नागरिकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागणार आहे. पूर आणि समुद्रपातळी वाढण्याचा अधिक धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Onion Export : सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
- Maharashtra : शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणी वाढणार? महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणाच्या हाती...