Narendra Singh Tomar : आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करणार, भारताला जागतिक स्तरावर उत्पादन वाढवण्याची संधी : कृषीमंत्री
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करणार असल्याचेही मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले.
Narendra Singh Tomar : संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष ( International Year of Millets) म्हणून घोषित केला आहे. त्यामुळं यावर्षीच्या महिला किसान दिवसाची संकल्पना 'भरड धान्य : महिलांचे सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षा प्रदान करणे अशी असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिलं आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळं जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणं, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करण्याची भारताला संधी मिळणार असल्याचे तोमर म्हणाले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करणार असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून 15 ऑक्टोबर 2022 रोजी 'महिला किसान दिवस' साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तोमर बोलत होते. संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यावर्षीच्या महिला किसान दिवसाची संकल्पना 'भरड धान्य : महिलांचे सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षा प्रदान करणे" अशी असल्याचे तोमर म्हणाले. या कार्यक्रमाचे तांत्रिक सत्र हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE) द्वारे भारतीय भरड धान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद यांच्या तांत्रिक सहाय्याने आयोजित करण्यात आले होते.
भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांचं समर्थन
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले होते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केल्याचे कृषीमंत्री तोमर म्हणाले. भारतीय भरड धान्य, या धान्याच्या विविध पाककृती, मूल्यवर्धित उत्पादने जागतिक स्तरावर स्वीकारली जावीत यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करण्याचे घोषित केल्याचे तोमर म्हणाले.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळं, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच फूड बास्केटचा मुख्य घटक म्हणून भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण अन्न प्रणालींमध्ये उत्तम संपर्काला प्रोत्साहन देणे यासर्वांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार महिलांना कृषी क्षेत्राच्या विकासात प्राधान्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे तोमर यांनी सांगितले.
भरड शेती जैवविविधतेचे रक्षण करते
महिला या अन्नधान्याच्या प्राथमिक उत्पादक आहेत, जैवविविधतेच्या संरक्षक आहेत आणि भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. भरड शेती जैवविविधतेचे रक्षण करते आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम शेतकरी म्हणून आणि त्यापाठोपाठ स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम बनवते. त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करुन आपल्यासमोरील समस्या व्यवस्थितपणे मांडायला कणखर बनवते. त्यामुळं भरड धान्यावर आधारित कृषी म्हणजे बदलत्या काळाशी सुसंगत असल्याचे तोमर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: