Agriculture news : 'ही' आहे जगातील सर्वात मोठी DBT योजना, शेतकरी असाल तर असा घ्या लाभ
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात आहे.
Agriculture news : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच यामागचा उद्देश आहे. दरम्यान, या संदर्भात, सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देखील चालवत आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेला जगातील सर्वात मोठी DBT (Direct Benefit Transfer) योजना देखील म्हटले जाते.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारनं 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता शेतकरी 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर लगेच करा. शेतकरी बांधवांनी नोंदणी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे ते पैसे तुमच्या बँक खात्यात येतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना शेतकरी बांधवांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक, लिंग, आधार कार्ड क्रमांक, पत्ता तपासावा. याशिवाय शेतकरी बांधवांचे ई-केवायसी अद्याप झाले नसेल तर त्यांनी ते लवकर करून घ्यावे. नियमांनुसार, योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसीसाठी शेतकरी अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in ला भेट देऊ शकतात.
तुम्ही अशी मदत घेऊ शकता
शेतकरी बांधवांना अर्ज करताना काही अडचण येत असेल तर ते अधिक माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. त्याच वेळी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
दरवर्षी मिळतात सहा हजार रुपये
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यात पाठवले जातात. म्हणजेच प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना कोणतीही चूक करू नका. जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल आणि अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर तुम्ही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. अशा स्थितीत तुम्ही लवकरात लवकर eKYC करुन घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल किंवा तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही ते करून घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Kisan Yojana : PM किसानचा 15 वा हप्ता मिळणापूर्वी करा 'हे' काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित