एक्स्प्लोर

PM Kisan Yojana : PM किसानचा 15 वा  हप्ता मिळणापूर्वी करा 'हे' काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

PM किसानचा 15 वा हप्ता मिळण्यापूर्वी लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जातेय. विविध कारणांमुळं काही शेतकऱ्यांना PM किसानचा 15 वा हप्ता मिळणार नाही.

PM Kisan Yojana :  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होत आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. आता 15 वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे PM किसानचा 15 वा हप्ता मिळण्यापूर्वी लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जातेय. विविध कारणांमुळं काही शेतकऱ्यांना PM किसानचा 15 वा हप्ता मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही त्यांना यादीतून वगळणार

शेतकऱ्यांना PM किसानचा 14 वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 15वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. 15 व्या हप्त्याचा  लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान अनेक शेतकरी लाभार्थी यादीतून वगळले गेले आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नाही त्यांना देखील या यादीतून वगळले जाऊ शकते.

या कारणांमुळेही पैसा अडकू शकतो

तुम्ही PM किसान योजनेंतर्गत पात्र असला तरीही तुमचे पैसे मिळणे बंद होऊ शकतात. कारण तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक नसणे अपेक्षीत आहे. त्यामध्ये लिंग, नाव, पत्ता आणि खाते क्रमांकामध्ये काही चूक असल्यास योजनेचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी याची खात्री करणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC करुन घ्यावी 

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल आणि अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर तुम्ही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. अशा स्थितीत तुम्ही लवकरात लवकर eKYC करुन घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावं लागेल किंवा तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊनही ते करून घेऊ शकता. 

दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत

PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 27 जुलैला PM किसानचा 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.  8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला होता.  

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan Yojana : 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचा 14 वा हप्ता जमा, पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget