(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हंगामाच्या शेवटी 'पांढर सोनं' तेजीत, नंदूरबार बाजार समितीत पार केला 11 हजारांचा टप्पा
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची आणि कापसाला हंगामाच्या शेवटी विक्रमी दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कापूस आणि मिरची विक्रमी दराचे टप्पे पार करत आहे.
Nandurbar Market Committee : सध्या कापूस आणि मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण बाजार समितीत सध्या कापूस आणि मिरचीला चंगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची आणि कापसाला हंगामाच्या शेवटी विक्रमी दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कापूस आणि मिरची विक्रमी दराचे टप्पे पार करत आहे. आवक कमी झाल्याने कापूस आणि मिरचीच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला गेल्या 10 वर्षातील सर्वात उच्चांकी दर मिळाला आहे.
नंदुरबार बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक कमी झाली असली तरी भाव मात्र तेजीत आहे. स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर दररोज 1000 क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाला 9000 ते 11450 पर्यंतचा दर मिळत आहे. बाजार समितीत गेल्या 10 वर्षात सर्वाधिक कापसाला दर मिळाला आहे. आजपर्यंत बाजार समितीतील परवानाधारक कापूस व्यापाऱ्यांनी 50 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. तर ओल्या लाल मिरचीला 8500 रुपयांचा दर मिळत आहे. कापसाला आणि मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र, हंगामाच्या शेवटी आवक कमी झाल्याने कापसाचे भाव तेजीत असतील असा अंदाज बाजार समितीच्यावतीने व्यक्त केला गेला आहे.
नंदूरबार बाजार समितीत कापसाला गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक दर मिळाला आहे. बाजार समितीत दररोज 1000 क्विंटल कापसाची आवक होते . कापसाला यावर्षी कमाल 8 हजार ते किमान 11450 पर्यंतचा दर मिळतोय. दुष्काळ, अवकाळी पाऊस, बोंडअळी या संकटामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे.
मिरचीचे सर्वात मोठे आगार असलेल्या नंदूरबार बाजार समितीत मिरचीच्या दरातही प्रचंड तेजी पाहण्यास मिळाली आहे. ओल्या लाल मिरचीचा दर आठ हजारच्या वर गेला आहे. गेल्या अनेक वर्षांतील ओल्या लाल मिरचीला मिळालेला हा सर्वाधिक दर मानला जात आहे. बाजार समितीत मिरचीची आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. अजून भावात तेजी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: