एक्स्प्लोर

हे तळं नाही तर विहीर! बीडच्या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्चून एक एकरात बांधली विहीर; कशी आहे ही विहीर?

Beed Farmers Well : बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे.या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे

Beed Farmers Well : तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी काठोकाठ पाण्यानं भरलेली विहीर नक्कीच बघितलेली आहे.  पण आम्ही तुम्हाला दाखवत असलेली अशी विहीर तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच पाहिलेली नसेल.  बीड जिल्ह्यातल्या पाडळसिंगी गावच्या मारुती बजगुडे या शेतकऱ्यानं दीड कोटी रुपये खर्च करून ही विहीर बांधली आहे. 41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असलेल्या या विहिरीमध्ये सध्या दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा त्यांनी करून ठेवला आहे. ही विहीर गुगल मॅपवर देखील स्पष्टपणे दिसत असून सध्या या विहीरीची एकच चर्चा आहे.

धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग लगत बजगुडे यांची ही बारा एकर शेती आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नव्हते. म्हणून त्यांनी एक एकरमध्ये विहीर करण्याचा निर्णय घेतला. बजगुडे यांचा मूळ व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा आहे. ही विहीर पूर्ण बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला.

या मधून निघालेलं जे मटेरियल आहे त्याची विक्री करून त्यातून मिळालेले 10 ते 12 लाख रुपये त्यांना विहीर बांधण्यासाठी कामी आले. आता या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बागायती शेती करायला सुरुवात केली आहे.

बजगुडे यांनी बांधलेली ही एवढी मोठी विहीर आता इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरतेय. त्यामुळे बीड मधूनच नाही तर शेजारच्या जिल्ह्यातून देखील अनेक शेतकरी ही विहीर पाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गर्दी करत आहे आणि या विहिरीजवळ आल्यावर तुम्हालाही सेल्फी काढण्याचा मोह आवरणार नाही. 

मुबलक पाण्यावर बागायती शेती करण्यासाठी अनेक शेतकरी शेत तलावाची निर्मिती करतात मारुती बाजगुडे यांनी मात्र 10 कोटी लिटर पाणी साठवून ठेवता येईल अशी विहीर बांधल्याने गावातील शेतकऱ्यांना देखील त्यांचं अप्रूप वाटतंय. या विहिरीतील पाण्यावर आता कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये टरबूज पेरू आणि मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.

पाण्याबाबतीत निसर्गाची मराठवाड्यावर कायम अवकृपा राहिलेली आहे. म्हणूनच मराठवाडा हा दुष्काळवाडा झाल्याचं चित्र सुद्धा आपण यापूर्वी पाहिलं होतं. तसं निसर्गानंही यावर्षी शेतकऱ्यांना भरभरून दिलं आणि एवढी मोठी आज पाण्याने काठोकाठ भरलीय. बाकी बजगुडे यांनी बांधलेली ही कदाचित राज्यातील सर्वात मोठी विहीर असावी.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget