एक्स्प्लोर

Fertilizer : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर वाढला, केंद्रीय खत सचिवांनी सांगितली आकडेवारी; वाचा सविस्तर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Seasion) डीएपी (DAP)आणि युरियाचा (Urea) वापर वाढला आहे. केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Fertilizer : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Seasion) डीएपी (DAP)आणि युरियाचा (Urea) वापर वाढला आहे. केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शेतकरी आणि राज्यांनी खतांचा संतुलित वापर करावा असे मिश्रा यांनी सांगितले आहे. चालू खरीप पिकाच्या हंगामात युरिया आणि डीएपीचा जास्त वापर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 13 लाख टन युरिया आणि 10 लाख टन डीएपीची वाढ झाली आहे.

चालू खरीप हंगामात विक्रमी 1.8 कोटी टन खतांचा वापर करण्यात आला आहे. युरियाच्या वापरात 13 लाख टनांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्ही 10,000 कोटी रुपयांचा आधुनिक आणि अत्यंत कार्यक्षम युरिया प्लांट उभारला तर तुम्ही एका वर्षात 10.5 लाख टन उत्पादन करु शकता. त्यामुळं अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला नवीन प्लांट उभारावा लागणार असल्याची माहिती केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी दिली.

खत वितरणावर बारकाईने लक्ष ठेवा

गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत डीएपीचा वापर 10 लाख टन अधिक होणार असल्याचे केंद्रीय खत सचिवांनी सांगितले. पाण्यानंतर उत्पादनावर परिणाम करणाऱ्या नऊ पीक निविष्ठांपैकी खत हे एक आहे. कृषी क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार खते देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रजत कुमार मिश्रा म्हणाले की, केंद्र सरकारनं 2022-23 मध्ये 2.5 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाचा बोजा उचलला आहे. खतांच्या वितरणावर काटेकोरपणे नजर ठेवण्यास आणि प्रादेशिक विषमता दूर करण्यासही त्यांनी राज्यांना सांगितले.

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. दिवसेंदिवस उत्पादकता आणि जमिनीचा पोत खराब होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत कुठलेही मार्गदर्शन अथवा सल्ला मिळत नसल्याने दिवसेंदिवस खतांचा वापर वाढत आहे, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणने सुद्धा आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीचा पोत बिघडू शकतो. त्यामुळं आवश्यक असल्यास तरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, अन्यथा सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महाराष्‍ट्रात देखील गेल्‍या दोन दशकांमध्‍ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सध्या महाराष्ट्रात 70 लाख मेट्रीक टनाहून अधिक खतांचा वापर होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget