एक्स्प्लोर

'संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद करता येणार नाही', साखर आयुक्तांचं कारखानदारांना पत्र

संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करता येणार नाहीत असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांना दिले आहेत. 

Maharashtra Sugar Mill Latest Udpate : यावर्षी राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळेच कार्यक्षेत्रातील नोंदणी असलेल्या व बिगर नोंदणीचा संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करता येणार नाहीत असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांना दिले आहेत. 

राज्यातील इतर जिल्हा प्रमाणेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडील ऊस या हंगामात साखर कारखान्यांपर्यंत पोहोचेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या दोन वर्षापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी साठ्याचे सोर्स वाढले आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये उसाची लागवड मराठवाड्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

तांत्रिक अडचणींमुळे बरेच साखर कारखाने हे खूप उशिरा सुरू झाले. त्यामुळेच त्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस साखर कारखान्यापर्यंत गाळप बंद होईपर्यंत पोहोचेल का अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागले आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत असतानाही अद्याप प्रशासनाकडून या संदर्भामध्ये कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. किमान शिल्लक राहिलेल्या उसाची माहिती घेऊन संबंधित साखर कारखान्याला प्रशासनाने कळवले तर कदाचित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचवता येऊ शकते.

काय म्हटले आहे पत्रात..

15 ऑक्टोबर 2021 पासून गाळपाची परवानगी राज्यातील साखर कारखान्यांना दिली त्यानुसार 197 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. 

प्राथमिक अंदाजानुसार एकूण 12.32 लाख हेक्‍टर क्षेत्रावरील चालू हंगामात उस उपलब्ध आहे

उस उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी..

एखाद्या साखर कारखान्याकडे अतिरिक्त ऊस शिल्लक राहत असल्यास नजीकच्या साखर कारखान्यांना अतिरिक्त होणारा संपूर्ण ऊस गाळप करण्याबाबत सुचवावे. 

शासनाच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्व प्रकारच्या साखर कारखान्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या उसाचे काळात झाल्याशिवाय बंद करता येणार नाही..

गाळप हंगाम बंद होण्याच्या पंधरा दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर प्रगटन द्यावे

विनापरवानगी कारखाना बंद केल्यास आणि कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाविना शिल्लक राहिला तर त्याची जबाबदारी ही साखर कारखान्यावर असेल आणि त्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा साखर आयुक्तांनी दिला आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा, घराचे छप्पर कोसळून वृद्धाचा मृत्यू,  शेती पिकांचंगी मोठं नुकसान
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
70 टक्के कांदा व्यापाऱ्यांच्या हातात, नाफेडने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन खरेदी करावी, अमोल कोल्हेंची मागणी
70 टक्के कांदा व्यापाऱ्यांच्या हातात, नाफेडने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन खरेदी करावी, अमोल कोल्हेंची मागणी

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
RBI : तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
Abdul Sattar and Eknath Shinde: अब्दुल सत्तारांचा भाजपशी थेट पंगा; एकनाथ शिंदेंनी सूचना देऊनही पुन्हा तेच म्हणाले, नेमकं काय घडलं?
अब्दुल सत्तारांचा भाजपशी थेट पंगा; एकनाथ शिंदेंनी सूचना देऊनही पुन्हा तेच म्हणाले, नेमकं काय घडलं?
Thane News: पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
Embed widget