एक्स्प्लोर

Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. येत्या 5 जुलै रोजी यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Shri Vitthal Sugar Election : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा 'राजवाडा' असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज असून, शेतकऱ्यांची देणी देखील आहेत. अशा आर्थिक अडचणीत सापडलेला साखर कारखाना गेल्या तीन हंगामात दोन हंगामात बंदच राहिला आहे. दरवर्षी 10 ते 12 लाख टन उसाचं गाळप करणारा कारखाना बंद असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या या साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. येत्या 5 जुलै रोजी या कारखान्यासाठी मतदान होत आहे. यामुळं पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे दिवंगत माजी आमदार  भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आहेत. त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून आरोप होत आहेत. अशातच सत्ताधारी गट असणाऱ्या 'विठ्ठल परिवारात' फूट पडल्याचे दिसत आहे. विठ्ठल परिवारात भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके, कल्याणराव काळे, कारखान्याचे संस्थापक औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील, अॅड. गणेश पाटील, अॅड. दिपक पवार हे होते. मात्र, सध्या युवराज पाटील अॅड. गणेश पाटील, अॅड. दिपक पवार यांनी वेगळा घरोबा केल्याचं चित्र दिसत आहे. या तिघांनी मिळून स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. 


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

अभिजीत पाटलांचा स्वतंत्र पॅनल

सत्ताधारी गटाला सोपी वाटणारी ही निवडणूक चालू वर्षी मात्र कठीण झाल्याची चर्चा सुरु आहे. कारण, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सत्ताधारी गटासमोर आव्हान निर्माण केलं आहे. सध्या अभिजीत पाटील यांच्याकडे चार कारखाने आहे. त्यामुळं  विठ्ठल सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या चालवणार असल्याचा विश्वास ते व्यक्त करत आहेत. अभिजीत पाटील हे सध्या गावोगावी सभासदांच्या गाठीभेटी घेत आहेत.


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

विठ्ठल परिवार एकत्र येणार का?

सध्या सत्ताधारी विठ्ठल परिवारात फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांचे एक पॅनेल आणि युवराज पाटील, गणेश पाटील आणि दिपक पवार यांचे दुसरे पॅनेल उभे राहिले आहे. या दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु आहे. या दोन्ही गटात चर्चा देखील सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं हे दोन गट एकत्र आल्यास सत्ताधारी गटाची ताकद वाढणार आहे. अन्यथा सभासदांच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे.

विठ्ठल परिवार एकत्र यावा ही माझी शेवटपर्यंत इच्छा : भगीरथ भालके

दरम्यान, या कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा डिजीटलने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडलेत. विठ्ठल परिवार एकत्र करण्याच्या बाबतीत चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी काल स्वतंत्र पॅनल उभी करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. विठ्ठल परिवार एकत्र यावा अशीच आमची भूमिका असल्याचे भालके यावेळी म्हणाले. मात्र, पुढच्या एक दोन दिवसात आणखी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ असे भालकेंनी सांगितले. सध्या निवडणुकीची तयारी आमची सुरु आहे. सभासदांच्या भेटी गाठी घेत असल्याचे भालकेंनी यावेळी सांगितले. आम्हाला सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी आम्ही कटीबद्ध

2002 पासून पुढे दिवंगत भारत भालके यांच्या चेअरमन पदाच्या काळात 60 ते 65 टक्के सभासद झाले आहेत. या सभासदांसोबत आमचे एक नातं आहे. आमच्या अडचणीत ते सोबत आहे. शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे भालके म्हणाले. यावेळी कारखाना सुरु करणार असल्याचे भालकेंनी सांगितले. कारखान्याचे एक्सपान्शन झाले. तसेच आमदार भारत भालके यांच्या काळात साखर कारखान्यानं दिडसे एकर जमिन घेतली. को जनरेशनचा प्रकल्प, नवीन डिसलरी प्रकल्प उभा केला, त्यानंतरच्या काळात गाळपही कमी झालं, त्यामुळं कर्ज वाढत गेलं आमि अडचणी वाढत गेल्याचे भालके यावेळी म्हणाले. भारत भालके यांच्या निधनानंतर बऱ्याच अडचणी येत गेल्या. जवळच्या लोकांनी अडकाठी घालण्याचा प्रयत्न केल्याचे भालके म्हणाले.

सभासदांचा चांगला प्रतिसाद, कारखाना सुरु करणार : अॅड गणेश पाटील

गेल्या 2 महिन्यापासून आम्ही 90  गावातील सभासदांच्या गाठीभेटी घेत आहोत. सभासदांचे म्हणणं जाणून घेत आहोत. त्यांची भूमिका एकल्यानंतर आम्ही स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अॅड गणेश पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. हा कारखाना सुरु झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्या बरोबर जर कोणी येणार असतील तर ठिक आहे. भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे सोबत येणार असतील तर आमची काही अडचण नाही. त्यांना सोबत घेऊ असेही पाटील यावेळी म्हणाले. सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडले ही गोष्ट खरी आहे. चेअरमनच्या धोरणामुळं कारखाना सुरु होऊ शकला नाही असा टोलाही यावेळी पाटील यांनी लगावला. या कारखान्यासंदर्भात शरद पवारसाहेबांशी बोलणं झालं आहे. तुम्ही लोकांपुढे जावा, लोकांचा विश्वास संपादन करा, पॅनल निवडून आणून माझ्याकडे, या मी सहकार्य करतो असे शरद पवार म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध होत असेल आणि संचालक मंडळच बदलणार नसले तर मग काय उपयोग असेही पाटील म्हणाले. सध्या कारखान्याचे नियोजन ढासळले आहे, मात्र, आम्ही शेतकऱ्यांची सर्व देणी देऊन कारखाना सुरु करणार असल्याचा विश्वास यावेळी गणेश पाटील यांनी व्यक्त केला.


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

अभिजीत पाटलांचं शक्तीप्रदर्शन, स्वाभिमानीची साथ

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सध्या साडे सहाशे कोटी रुपयांची देणी आहेत. त्यामुळे हा कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. हा कारखाना बंद असल्यामुळं या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता हा कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी अभिजीत पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. ते सध्या गावोगावी सभासदांच्या भेटीगाठी घेत आहेत. शेतकऱ्यांची देणी दिल्याशिवाय कारखान्याची मोळी टाकणार नसल्याचे पाटील सांगत आहे. अभिजीत पाटील यांच्या गटाला सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला आहे. शेतकरी बांधवांचा स्वाभिमान जागृत ठेवणारी संघटना आपल्या पाठीशी असल्यानं आता विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. प्रस्थापितांनी युतीचा केलेला प्रयत्न फसला असताना, आपली शेतकरी संघटनांसोबत झालेली युती ही जनतेचा कौल दर्शविणारी ठरली असल्याचं अभिजीट पाटलांनी सांगितलं आहे.


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

निवडणुकीची प्रक्रिया

3 ते 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होती. १० जूनला अर्जांची छाननी झाली. १३ जूनला उमेदवारांची यादी, 13 ते 27 जूनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. २८ जून रोजी निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप होणार आहे. तर 5 जुलै रोजी मतदान होणार असून 6 जुलैला मतमोजणी पार पडणार आहे.

21 जागांसाठी निवडणूक 

विठ्ठल सहाकारी साखर कारखान्याची 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाळवणी गट 3, करकंब गट 3, मेंढापूर गट 2, तुंगत गट 2, सरकोली गट 2, कासेगाव गट 3 याशिवाय उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन 1, अनुसूचित जाती जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागासवर्गीय , भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे.

कारखान्याचा इतिहास

दिवंगत औदुंबरराव पाटील यांनी 1978 साली गुरसाळेच्या माळरानावर विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभा केला. अल्पावधीतच हा साखर कारखाना कर्जमुक्त करुन औदुंबर पाटील यांनी विक्रम प्रस्थापित केला. कालांतराने औदुंबर पाटील यांनी आपले धाकटे चिरंजीव राजाभाऊ पाटील यांच्याकडे धुरा सोपविली तरीही कारखान्यावर पकड औदुंबरअण्णा यांचीच होती. मात्र राजाभाऊ आणि कारखान्यातील संचालक मंडळ यांच्यात खटके उडू लागले. तत्कालीन विठ्ठलचे संचालक वसंतदादा काळे यांना चंद्रभागा सहकारी साखर कारखाना उभारण्याचे वचन औदुंबरअण्णा पाटील पूर्ण करु शकले नव्हते. त्यानंतर ज्ञानेश्वर गायकवाड, वसंतदादा काळे यांनी एकत्र येऊन औदुंबर पाटील गटाविरोधात बंड उभारले. 1999 साली वसंतदादा काळे यांनी औदुंबर पाटील गटाचे रुपांतर विठ्ठल परिवारात केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मदतीने वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना उभा केला. दोन कारखानांच्या मिळून विठ्ठल परिवार म्हणून ओळखला जाऊ लागला. 1999 च्या विधानसभेत वसंदादा काळे यांचा पराभव झाला. त्यानंतर लगेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लागली. या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी वसंतदादा काळे यांचे पॅनेल निवडून आले. या निवडणुकीत चेअरमनपदासाठीचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड हे औदुंबर पाटील गटातून तर ऐनवेळी भारत भालके हे वसंतदादा काळे गटातून उभे राहिले होते.


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

वसंतदादा काळे यांचे बंड

ज्ञानेश्वर गायकवाड हे चेअरमनपदासाठी इच्छुक होते पण ऐनवेळेस वसंतदादा काळे यांनी सर्व सूत्रे हातात घेऊन बंडाचे निशाण उभारले. हे बंड यशस्वी करण्यासाठी वसंतदादा काळे यांनी सर्व पैलवानी डावपेच वापरले,ज्याला जे पाहिजे ते पुरवले.1999 साली वसंतदादा काळे यांनी औदुंबर पाटील गटाचे रूपांतर विठ्ठल परिवारात केले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मदतीने वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना उभा केला. दोन कारखानांच्या मिळून विठ्ठल परिवार म्हणून ओळखला जाऊ लागला. वसंतदादा काळे यांना आमदार होण्याचे स्वप्न पडू लागले त्यांनी 1999 साली जीप हे चिन्ह घेऊन युती पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढविली. वसंतदादा काळे यांनी लक्षवेधी लढत दिली पण सुमारे 15500 मताने सुधाकर परिचारक हे विजयी झाले. विधानसभेनंतर लगेचच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लागली. येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी चूक केली सुमारे 3300 मताने वसंतदादा काळे यांचे पॅनेल निवडून आले. या निवडणुकीत चेअरमनपदासाठीचे इच्छुक उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड हे औदुंबर पाटील गटातून तर ऐनवेळी भारत भालके हे वसंतदादा काळे गटातून उभे राहिले. 

विठ्ठलच्या निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. जरी नेत्यांमध्ये चढाओढ असली तरी विठ्ठलचा 'सज्ञ' सभासद विजयाची माळ कोणाच्या गळात घालणार हे पाहणं महत्वाटं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget