एक्स्प्लोर

Tomato Price : आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात घसरण, 80 रुपयांवरुन दर 25 ते 30 रुपयांवर, शेतकरी संकटात

सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे.

Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर थेट 25 ते 30 रुपयांवर आल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत.

सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर हे थेट 25 ते 30 रुपयांवर आले आहेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळं दर घसरत आहेत. 

दिवाळीनंतर चांगला दर मिळण्याची होती अपेक्षा 

मागील एक महिन्याचा विचार केला तर, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला होता. या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत गेली. मात्र आता दिवाळीनंतर तरी शेतकऱ्यांच्या राहिलेल्या मालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 10 ते 15 दिवसांची तुलना केली तर टोमॅटोचे दर 80 रुपयांवर गेले होते. आता मात्र, हे दर 25 ते 30 रुपयांवर खाली आहे आहेत. बाजापरेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं दर घसरल्याची माहिती यावेळी नाशिक बाजारातील विक्रेत्यांनी दिली. हे दर आणखी घसरण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

गिरणारेच्या बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

काही दिवसांपासून नाशिकमधील गिरणारेच्या (Girnare) बाजारपेठेत सुरु असलेल्या टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. त्यामुळं तिथेही टोमॅटोच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे.  नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ (Lasalgoan) सर्वात महत्वाची समजली जाते. त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. गिरणारे परिसरातील हजारो शेतकरी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असून या बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपारिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले आहेत. त्यामुळे गिरणारे परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. लहानात लहान शेतकरी देखील भाताचे एक वावर कमी करून टोमॅटो लागवड करण्यावर भर देत आहेत. अशातच यंदा झालेल्या जोरदार पावसाने त्यातही परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा तडाखा बसला. 

महत्त्वाच्या बातम्या:

Potato tomato prices : बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना बसतोय फटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget