Wardha farmers : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत खतं बी बियाणांचं वाटप, वर्धा सोशल फोरमचा उपक्रम
शेतकरी सध्या खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी-बियाणांचे वाटप करण्यात आलं.
![Wardha farmers : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत खतं बी बियाणांचं वाटप, वर्धा सोशल फोरमचा उपक्रम Distribution of free fertilizer seeds to suicidal farmer families, Wardha Social Forum initiative Wardha farmers : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मोफत खतं बी बियाणांचं वाटप, वर्धा सोशल फोरमचा उपक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/06fe9d803d4bea09bf40c9c02e975f80_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Wardha farmers News : सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झालं आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अद्याप पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी सध्या खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. खते बी बियाणांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी-बियाणांचे वाटप करण्यात आलं. पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणं आणि खतांचं वितरण करण्यात आलं.
वर्धा सोशल फोरम आणि दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीनं हा मान्सून भेट 2022 हा उपक्रम राबवण्यात आला. याद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणं आणि खतांचं वितरण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आत्महत्या टाळता याव्यात, या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, डॉ. अभ्यूदय मेघे, अविनाश सातव हे उपस्थित होते.
गेल्या सात वर्षाच्या काळात एक हजारांच्या वरती आत्महत्याग्रस्त महिला कुटुंबांना बी बियाणे लागवडीसाठी वितरित करण्यात आले आहेत. वर्धा सोशल फोरमच्या वतीनं आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर यंदाच्या वर्षी 85 आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना बी बियाणे खते औषधे दिली आहेत. यावेळी खत वितरित करताना शेतकरी महिलांना अश्रूही अनावर झाले.
दरम्यान, राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसानं दडी मारली आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sowing : राज्यात फक्त एक टक्काच पेरणी, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, बळीराजाचे डोळे आभाळाकडं
- Animal Husbandry : पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी? जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय करावं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)