Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ, शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ. त्यासाठी शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं.
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ. त्यासाठी शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं. दिवसा 12 तास वीज द्या, अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी आपण एक निर्णय घेतलाय. यासाठी सोलरवर आम्ही भर देत आहोत. याचा पहिला प्रयोग आपण 2017 मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात केला होता असेही फडणवीस म्हणाले. तो सत्यात उतरला आहे. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही सोलरवर भर देत आहोत. यावर्षी 30 टक्के फिडर आम्ही सौरऊर्जेवर आणणार आहोत. त्याठिकाणी दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असे फडणवीस म्हणाले. 2017 साली आपण पहिला प्रयोग राळेगणसिद्धीत केला होता. तो खूप यशस्वी झाला होता. यावर्षीपासून सोलरच्या संदर्भातील काम सुरु करणार आहोत. पुढच्या दोन वर्षात सगळं काम पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.
नापिकी असलेली जमिन 30 वर्षासाठी सरकारला भाड्यानं द्या, फडणवीसांचं आवाहन
ज्या ठिकाणी शेतीत काही फारसे पिकत नसेल तर ती शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला सरकार तयार असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतीची मालकी शेतकऱ्यांचीच असणार आहे. त्या बदल्यात आम्ही तुम्हीला वर्षाला 75 हजार रुपये भाडे देऊ असेही फडणवीस म्हणाले. दरवर्षी त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करु असेही फडणवीस म्हणाले. 30 वर्ष तुमच्या शेतीचा वापर सोलरसाठी करु असेही फडणवीस म्हणाले. 30 वर्षांनी तुमची शेती तुम्हाला परत करु असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळं जिथं नापिकी आहे किंवा शेतकऱ्याला शेती करायला वेळ नाही, घरी शेती करणारे कोणी नाही, अशा शेतकऱ्यांनी आम्हाला शेती द्यावी असे आवाहन फडणवीसांनी केलं. ही शेती आम्हाला दिली तर दोन पैसे तुम्हाला मिळतील आणि शेतकऱ्यांला सोलरची वीज देखील खूप मिळेल असे फडणवीस म्हणाले.
नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन
गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकट आली आहेत. यासाठी शाश्वत शेतीकडे वळावे लागेल. यासाठी विषमुक्त शेती गरजेची असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सध्या शेतीत रासायनिक वापर होत असल्यानं आपल्या काळ्या आईची शक्ती समाप्त झाली आहे. दुसरीकडे तेच अन्न खाऊन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचं असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: