(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
पिक विमा भरताना जर शेतकऱ्यांकडून 1 रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
Crop Insurance News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पिक विमा भरत आहेत. पिक विम्याचा (Pik Vima) अर्ज भरण्यासाठी फक्त 1 रुपयाचे शुल्क आकारले जाते. मात्र, हा पिक विमा भरताना जर शेतकऱ्यांकडून 1 रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र ही तक्रार कुठं करावी? याबाबतची माहिती देखील सरकारनं दिली आहे.
पिक विम्याचा अर्ज भरताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक
धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य विमा गरजेचा झाला आहे, अगदी त्याच पद्धतीने पीक विमा सुद्धा (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अत्यावश्यक झाला आहे. पिक विम्याचा अर्ज भरताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक होते. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची पिळवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारनं खबरदारी बाळगली आहे. शेतकऱ्यांकडून जर 1 रुपयापेक्षा जास्त शुल्काची मागणी कोणी केली तर तक्रार नोंदवण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. सरकारनं यासाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. तसेच व्हाट्सअॅपचा नंबर, ईमेल आयडी देखील दिला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना📣
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2024
पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून ₹ १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास येथे तक्रार नोंदवा.👇
टोल फ्री : १४४११ / १८००१८००४१७
तक्रार नोंद : ०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४
व्हाट्सअॅप : ९०८२९२१९४८
ईमेल : support@csc.gov.in pic.twitter.com/MmKSWrpuhr
कुठे कराल तक्रार?
टोल फ्री : 14411/ 18001800417
तक्रार नोंद : 022-414581933 / 022-414581934
व्हाट्सअॅप : 9082921948
ईमेल : support@csc.gov.in
वरील दिलेल्या ठिकाणी तुम्हाला याबाबतची तक्रार दाखल करता येणार आहे.
'या' पिकांसाठी पिक विमा मिळणार
खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा ही 14 पिके पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विमा भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आलं आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या वर्षी सुद्धा एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा करावा, असं आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
पिक विमा योजनेसाठी कसा कराल अर्ज?
- सुरुवातीला पीक विमा सर्च केल्यानंतर https://pmfby.gov.in/ ही वेबसाईट प्रथम दिसून येईल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट ओपन झाल्यानंतर फार्मर अॅप्लिकेशन पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यायावर क्लिक करा
- नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करून सर्व माहिती भरा
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये