Crop Insurance : पीक विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीचा मोठा निर्णय, 16 जिल्ह्यातील कार्यालये बंद करणार, सुत्रांची माहिती
Crop Insurance : पीक विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीनं 16 जिल्ह्यातील आपली कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांची दिली आहे.
Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) काम बघणाऱ्या AIC कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यात काम बघणाऱ्या AIC या कंपनीनं आपली 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता खरीप हंगामात कोट्यवधी रुपये प्रीमियम भरूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची? कोणाला फोन करुन माहिती घ्यायची हा मोठा प्रश्न राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अत्यल्प विम्याचा लाभ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या महिनाभरात केलेल्या अनेक आंदोलनामुळं अनेक शेतकरी जागृत झाले आहेत. त्यांनी आपण भरलेल्या पीक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी AIC या निमशासकीय कंपनीकडे पीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून तगादा लावला होता. मात्र, कंपनीने वेगवेगळी कारणे देत पीक विमा भरपाई देण्याचं कुठे टाळलं तर कुठे शेतकऱ्यांना अत्यल्प विम्याचा लाभ दिला. तर दुसरीकडे बुलढाणा कृषी अधीक्षक यांनी बुलढाणा शहर पोलिसात या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा म्हणून विमा कंपनीचे अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळं आता या कंपनीने काम करत असलेल्या राज्यातील 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं शेतकाऱ्यांसमोर आता प्रीमियम भरूनही विम्याचा लाभ मिळविण्यासाठी कुठे तक्रार करायची ? असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या 16 जिल्ह्यात AIC कंपनीनं कार्यालये बंद करण्याचा घेतला निर्णय
राज्यातील 16 जिल्ह्यात AIC कंपनी विमा योजनेचं काम करते. या 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय AIC या कंपनीनं घेतला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवमाळ, सोलापूर, जळगाव, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 233 कोटी रुपये कंपनीकडे जमा
विशेष म्हणजे एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जवळपास 233 कोटी रुपये प्रीमियमच्या रुपानं कंपनीकडे जमा केले होते. मात्र, कंपनीने आतापर्यंत निवडक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला आहे. तर काही शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या प्रीमियमपेक्षाही कमी रक्कम विमा म्हणून मिळाली असल्याने कंपनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी 27 नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना धारेवर धरले होते. कृषी अधीक्षक बुलढाणा यांनी पोलीसात तक्रार केल्याने AIC या कंपनीने आता अनाधिकृतपणे आपली 16 जिल्ह्यातील कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: