एक्स्प्लोर

Bhandara News : शेतकऱ्यांना दिलासा! रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ

राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रब्बी हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Bhandara News: भंडारा : भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. अशातच रब्बी हंगामातील धानाची विक्री (Paddy), आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असतं. या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. मात्र, यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदत वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) रब्बी हंगामाच्या धान विक्रीकरिता त्यांची नोंदणी नजिकच्या केंद्रावर करावी, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केलं आहे.

31 मे पर्यंत मुदतवाढ

आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान अथवा भरड धान्य, मका इत्यादि करिता ऑनलाईन नोंदणीची तारीख ही 30 एप्रिल ठरवण्यात आली होती. मात्र, भंडारा जिल्ह्यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही ऑनलाईन शेतकरी नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार धान, भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 31 मे 2024 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या केंद्रावर जाऊन करावी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की, जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा (चालू हंगामाचा पिकपेरा असलेला), नमुना 8 अ, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगामामध्ये धान विक्री करता येईल. शेतकरी बाधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी नजिकच्या शासकिय धान, भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्थांकडे कागदपत्र सादर करुन  धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडुन करण्यात आले आहे. 

राईस मिलर्सच्या प्रलंबित मागण्यांमुळे धानाची भरडाई रखडली

भंडारा जिल्ह्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची शेती करतात. शासनाच्या वतीने आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केला जातो. मात्र, आदिवासी महामंडळाचे गोडाऊन नसल्याने खरेदी केलेला धान ताडपत्रीचा आधार घेत मोकळ्या जागेवर ठेवण्यात येते. यावर्षी राईस मिलर्सच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने धानाची उचल न केल्याने गेल्या 4 महिन्यांपासून हा धान उघड्यावर तसाच पडून आहे. यावर्षी अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्याला झोडपून काढल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाला अंकुर फुटल्याने केंद्र चालकांचे नुकसान झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cotton Trade : खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या संकटात; बांगलादेश-अमेरिका करारामुळे अडचणी वाढण्याची भीती
खान्देशातील जिनिंग व्यवसाय मोठ्या संकटात; बांगलादेश-अमेरिका करारामुळे अडचणी वाढण्याची भीती
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! आता माणसाप्रमाणे शेतीलाही मिळणार आधार कार्ड, जमिनींसाठीचे वाद कमी होणार?
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! आता माणसाप्रमाणे शेतीलाही मिळणार आधार कार्ड, जमिनींसाठीचे वाद कमी होणार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार? 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  PM किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार? 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये
Akola Pattern In Cotton : कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?
कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
Embed widget