एक्स्प्लोर

बीडचा रँचो... जुन्या मोटर सायकलपासून तयार केलं शेतीचं यंत्र, कमी खर्चात पेरणी, फवारणी आणि नांगरणी शक्य

Beed News : बीडच्या मौज मधले बप्पासाहेब डावकर हे प्रयोगशील शेतकरी. त्यांनी शेती करण्यासाठी लागणार्‍या पेरणी आणि कोळपणी यंत्राची निर्मिती केली आहे.

Beed News : आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीत अनेक नवनवीन बदल करत आहेत. बीड जिल्ह्यातल्या मौज येथील एका शेतकर्‍यानं शेती करण्यासाठी लागणार्‍या पेरणी आणि कोळपणी यंत्राची निर्मिती केली आहे. 

बीडच्या मौज मधले बप्पासाहेब डावकर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनीच शेतीमध्ये मजुरांना भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी घरांमध्ये पडून असलेली जुनी टू व्हीलर बाहेर काढली आणि त्यावरच सुरुवातीला पेरणी यंत्र जोडलं. त्यानंतर त्याच पेरणी यंत्राला सोबत फवारणी यंत्र जोडून उपयोग केला. आता तर शेतीची सगळी मशागत ते या यंत्राद्वारे करतात.

दुचाकीला जोडून तयार केलेलं हे पेरणी यंत्र. शेतात अंतरमशागत आणि इतर कामं करण्यासाठी मजुरांची टंचाई भासू लागल्यानं वेळेत शेतातली काम व्हावीत म्हणून बाप्पासाहेब डवकर या शेतकर्‍यान हे यंत्र बनवलं आहे. अगदी कमी वेळात हे यंत्र पेरणी आणि फवारणी करत आपल्या जुन्या मोटारसायकलला थ्री व्हीलरमध्ये कन्व्हर्ट करून हे यंत्र बनवण्यात आलं. हे यंत्र बनवण्यासाठी त्यांना एक लाख दहा हजार रुपये एवढा खर्च आला असून अगदी कमी पेट्रोलमध्ये हे यंत्र शेतीची मशागत करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. 

पेरणी यंत्राबरोबरच त्यांनी एक कोळपणी यंत्र देखील तयार केल आहे. कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना ट्रॅक्टर आणि बैलाच्या सहाय्यानं शेती करनं परवडत नाही. त्यामुळे त्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. पिकामध्ये वखारणी आणि कोळपणी करणं अगदी सोपं असून उभ्या पिकात देखील तण काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. या दोन्ही यंत्राणांवर रिवर्स गेअर बसवण्यात आला असल्यानं हे चालवण्यासाठी देखील अगदी सोपं आहे. 

सुरुवातीला या यंत्राचा वापर ते स्वत: च्या शेतात पेरणी आणि मशागत करण्यासाठी करत होते. त्यानंतर परभणीच्या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि शेतकर्‍यांच्या मागणीवरून या यंत्राची त्यांनी विक्री सुरू केली आहे. आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना नवनवीन अवजारांची गरज असते आणि हीच गरज ओळखून बाप्पासाहेब यांनी अगदी कमी खर्चात शेतकर्‍यांना परवडणार हे यंत्र तयार केलं आहे. याचा फायदा अनेक शेतकर्‍यांना होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget