Pomegranate Farmers : राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात, केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
डाळिंबावर पिन बोरर आणि होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब बागांची पाहणी केली.
Pomegranate Farmers : राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण डाळिंबावर पिन बोरर आणि होल बोरर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंबाच्या बागा नष्ठ होण्याच्या मर्गावर आहेत. त्या बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक व नुकसान भरपाईसाठी मदत करावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब बागांची पाहणी केली आहे. याबाबत लवकरच सद्यस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय पथकातील सदस्यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या भागात डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणावर बागा आहेत. तसेच अक्कलकोट, करमाळा, माढा या भागातही डाळिंबाच्या बागा आहेत. या सर्वच तालुक्यांमध्ये केंद्रीय पथकाने डाळिंबाच्या बागांची पाहणी केली. बऱ्याच ठिकाणी पिन बोरर आणि होल बोररच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
दरम्यान, डाळिंबाच्या बागा संकटात सापडल्या आहेत. त्या बागा वाचविण्यासाठी केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक व नुकसान भरपाईसाठी मदत करावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री नरेद्रसिंह तोमर यांच्याकडे करण्यात आली होती. कही दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांच्या वतीने खासदार डॉ. विकास महात्मे आणि मोर्फाचे अध्यक्ष कॄषीभूषण अंकुश पडवळे यांनी कृषीमंत्री तोमर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली होती.
महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक मागील पाच वर्षापासून तेलकट डाग व अतिवॄष्टीमुळे अडचणीत असताना त्यात भर म्हणून झाडाला पिन बोरर व होल बोरर या किडीमुळे झाडाची मर मोठया प्रमाणावर वाढली आहे. या समस्येमुळे बागाच्या बागा संपत आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील चाळीस हजार हेक्टर जास्त क्षेत्र पिन व होल बोररमुळे आलेल्या मरीने संपले असून, ऐंशी हजार हेक्टरवरील क्षेत्राला या किडीची लागण झाली आहे. संशोधकांनी केलेल्या अनेक शिफारशींचे औषधे वापरूनही सदर किडीवर नियत्रंण मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- साखर कारखानदारी महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची...काय फरक, काय साम्य? उसाचं राजकारण महत्वाचं!
- 'साथी राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?', भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टींचं पत्र