एक्स्प्लोर

Agriculture Success Story : जिरेनियममधून बारामतीमधील 30 वर्षीय तरुण कमावतोय वर्षाकाठी 30 लाख रुपये

बारामतीमधील मुर्टी या दुष्काळी गावात 30 वर्षीय हेमंत जगदाळे या इंजिनिअर तरुणाने माळरानावर जिरेनियमचे नंदनवन फुलवले आहे. हेमंतकडे 10 एकर जिरेनियमचे पीक आहे. वर्षाकाठी हेमंत तब्बल 30 लाख रुपये कमावतो आहे.

Baramat Youth Geranium Success Story : हेमंत जगदाळे, वय वर्ष 30, शिक्षण इंजिनिअरिंग, व्यवसाय शेती... बारामती (Baramati) तालुक्यातील दुष्काळी पाट्यातील तरुण शेतकरी. हेमंत हा बारामती तालुक्यातील मुर्टी गावाचा तरुण. हेमंतने पारंपरिक शेतीला फाटा देत तीन वर्षांपूर्वी जिरेनियमसारख्या सुगंधी वनस्पती असलेल्या पिकाची एक एकरावर लागवड केली. जिरेनियम (Geranium) ही सुगंधी वनस्पती आहे. ज्याचा तेलाचा वापर हा कॉस्मेटिक तसेच अत्तर बनवण्यासाठी केला जातो. पहिल्याच पिकात नफा झाल्याने हेमंतने जिरेनियमचे क्षेत्र वाढवले सध्या हेमंतकडे दहा एकरावर जिरेनियमची लागवड केली आहे.  

बारामती तालुक्यातील मुर्टी हे दुष्काळी पट्ट्यातील गाव पण याच दुष्काळी गावात 30 वर्षीय हेमंत जगदाळे या तरुणाने जिरेनियमचे नंदनवन माळरानावर फुलवले आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हेमंतने शेती करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी एका एकरावर जिरेनियमची लागवड केली. आज हेमंतकडे 10 एकर जिरेनियमचं पीक आहे. तसेच त्याने नर्सरी देखील सुरु केली आहे. यातून वर्षाकाठी हेमंत तब्बल 30 लाख रुपये कमावतो आहे.

Agriculture Success Story : जिरेनियममधून बारामतीमधील 30 वर्षीय तरुण कमावतोय वर्षाकाठी 30 लाख रुपये

सुरुवातीला एक एकरावर लागवड केल्यानंतर हेमंतला जिरेनियमचे तेल काढण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर त्याने स्वतःचं तेल काढण्याचे युनिट देखील उभे केले. सध्या त्याच्या तेलाला बाजारात साडे अकरा हजार रुपये किलो एवढा दर मिळत आहे. तसेच जिरेनियम लागवड करताना दर्जेदार रोपांची लागवड करावी म्हणून हेमंतने नर्सरी देखील चालू केली आहे. आज याच रोपांना राज्यभरातून मोठी मागणी आहे.

जिरेनियमची दर चार महिन्याला छाटणी केली जाते. तसेच एकरी लागवडीचा खर्च हा 90 हजार ते 1 लाखाच्या दरम्यान येतो. पहिल्याच छाटणीत साधारपणे 80 ते 90 हजार मिळतात. वर्षातून जिरेनियम पिकच्या तीन छाटण्या होतात. पीक साधारणपणे तीन ते साडेतीन वर्ष चालते आणि एका एकरातून 3 वर्षात साधारणपणे 9 लाख रुपये मिळत असल्याचे हेमंत सांगतो. आज हेमंत जिरेनियमच्या पिकातून आणि नर्सरीतून वर्षाकाठी 30 ते 35 लाख रुपये कमावतो.

Agriculture Success Story : जिरेनियममधून बारामतीमधील 30 वर्षीय तरुण कमावतोय वर्षाकाठी 30 लाख रुपये

गेली 30 ते 35 वर्ष याच शेतात पारंपरिक शेती करणाऱ्या हेमंत याचे वडील सतीश जगदाळे यांचा पिकात उत्पादन खर्च देखील निघत नव्हता, त्याच माळरानावर हेमंत लाखोंचे उत्पादन घेत आहे. गेल्या तीन वर्षात जगदाळे कुटुंबियांची संपूर्ण परिस्थिती बदलून गेली. त्यामुळे हेमंतच्या वडिलांच्या मनात हेमंत बद्दल अभिमानाची भावना आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Full  : शरद पवारांच्या 'त्या'  वक्तव्यानं बारामतीत लेकीचं नुकसान  होणार?Zero Hour : नारायण राणेंना उमेदवारी, महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटलाZero Hour Amit Shah: पुन्हा एकदा 'कमळ' फुलणार, अमित शाहांचा विश्वासZero Hour : बारामतीसाठी नणंद-भावजयचा अर्ज दाखल, बारामतीत गाजणार 'सुने'चा मुद्दा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
Embed widget