(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato Price : राजधानी दिल्लीत टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 200 रुपये
Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळं दरात मोठी वाढ होत आहे.
Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळं दरात मोठी वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) सध्या टोमॅटोची 'लाली' अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपये द्यावे लागत आहेत. दर दिल्लीतील मदर डेअरीने सफाल रिटेल आउटलेटवर टोमॅटोची 259 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळं टोमॅटोचे भाव एक महिन्याहून अधिक काळ झालं वाढले आहेत.
सध्या देशभरात टोमॅटो दरात मोठी वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहे, त्यांना मोठा फायदा होत आहे. सध्या ज्या प्रमाणात टोमॅटोला मागणी आहे ,या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही. परिणामी टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 170 ते 200 रुपये द्यावे लागत आहेत. राष्ट्रीय राजधानीतील किरकोळ किंमती अलीकडेच खाली येऊ लागल्या होत्या. परंतू कमी पुरवठ्यामुळे पुन्हा टोमॅटोच्या किंमती वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली, तर मदर डेअरीच्या सफाल रिटेल आउटलेटवर त्याची किंमत 259 रुपये प्रतिकिलो होती.
आझादपूर बाजार समितीत टोमॅटोची 170 ते 220 रुपये प्रति किलो दरानं विक्री
गेल्या दोन महिन्यांपासून खराब हवामानामुळं टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याची माहिती मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिली आहे. गेल्या दोन दिवसांत आझादपूर मंडईत टोमॅटोची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळं घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे. आशियातील सर्वात मोठ्या फळ आणि भाजीपाला घाऊक बाजार आझादपूरमध्ये काल (2 ऑगस्ट) टोमॅटोचा घाऊक दर दर्जानुसार 170-220 रुपये प्रति किलो होता. आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी झाली आहे. कारण अतिवृष्टीमुळं टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये पिकांचं नुकसान झाले आहे. याचा परिणाम दरांवर झाल्याची माहिती अशोक कौशिक यांनी दिली. काल (2 ऑगस्ट) आझादपूर मंडईत केवळ 15 टक्के टोमॅटोचा पुरवठा झाल्याची माहिती कौशिक यांनी दिली. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून केवळ सहा लहान ट्रकचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळेही भाव वाढले. येत्या 10 दिवसांत पुरवठ्याची स्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्याची माहिती कौशिक यांनी दिली.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली
15 एप्रिलपासून तीन ते चार जूनपर्यंत बाजारात टोमॅटो फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. साधारण: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. एप्रिल ते मे महिन्याच्या काळात प्रचंड ऊन होतो, अशातच टोमॅटोला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी करणे सोडून दिल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी लागवडी सोडून दिल्यामुळं बाजारात माल येणार कोठून, त्यामुळं बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली.
महत्त्वाच्या बातम्या:
Tomato Price : महाराष्ट्रात टोमॅटोचे दर का वाढतायेत? शेतकऱ्यांना फायदा होतोय का? शेतमाल बाजार अभ्यासकांचं म्हणणं काय...