एक्स्प्लोर

Sugar Price : साखरेचा गोडवा वाढला, दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ; निर्यातबंदी होणार का?

मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत.

Sugar Price : साखरेच्या दरात (Sugar Price) तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हा सर्वोच्च दर आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केलीय. कारण देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे.

जूनमध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर हे 42 रुपये किलो होते. तर जुलै आणि ऑगस्टमध्ये हे दर 44 रुपयांवर गेले होते. तर आता चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बॉम्बे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे.  

ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होण्याची शक्यता

पीक हंगाम 2023-24 मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतात, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे. 

साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता

दरम्यान, साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शेतीमालाचे दर पाडण्यासाठी निर्णय घेत आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा, तांदूळ या शेतमाल उत्पादकांना फटका बसला आहे. आता साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेवर साठे मर्यादा (स्टॉक लिमिट) लावण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत.

यावर्षी भारतात 330 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज 

गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किंमतीत (Sugar Price) 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 43.30 रुपये इतकी राहिली आहे. किंमती सध्या याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात देशात साखरेच्या किमतीत 2 टक्क्यांपेक्षा कमी वार्षिक महागाई दर राहिला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान, यावर्षी भारतात 330 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर साखरेचा देशांतर्गत खप सुमारे 275 लाख मेट्रीक टन राहण्याचा अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sugar : यावर्षी भारतात 330 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget