एक्स्प्लोर

Abdul Sattar : आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन, पणनमंत्री सत्तारांची माहिती

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग (agricultural processing industry) उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

Abdul Sattar : डोंगराळ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग (agricultural processing industry) उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिली आहे. शेतकरी हितासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याचे सत्तार म्हणाले. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज आणि शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत राज्यातील संस्थांना विशेष अर्थसहाय्य योजना राबविणे. तसेच योजनेचे स्वरूप निश्चित करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सत्तार बोलत होते. 

शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळं त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. त्यामुळं डोंगराळ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचा विचार असल्याचे सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतमालाला अधिक दर मिळण्यास मदत होईल असे पणनमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पणन महामंडळाला या बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीला वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. महाजन, पणन विभागाचे उपसचिव सुग्रीव धपाटे, पणन मंडळाचे संजय कदम, पणन मंडळाचे सहसंचालक मधुकांत गरड संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये वाढ करणं गरजेचं

राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. विकसित राष्ट्रांमध्ये कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त आहे. शेतमाल प्रक्रिया ही महत्त्वाची बाजार सेवा आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये कच्चा माल विक्रीसाठी नेण्यापेक्षा मालावर प्रक्रिया करुन माल विकल्यास चांगली किंमत मिळते. त्या दृष्टीकोनातून भारतातील शेतमाल प्रक्रिया उद्योगांना शासनामार्फत अनुदान (सबसीडी) देऊन कृषी उद्योगांना मोठी चालना देण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतमाल प्रक्रिया उद्योगात वाढ व्हावी, शेतीचे उत्पादन दुप्पट होईल, कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल त्यातून शेतकऱ्यांना आशादायी दिलासा मिळेल. जागतिकीकरण धोरण स्वीकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षा रूंदावल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कृषिप्रक्रियायुक्त पदार्थ जास्त प्रमाणात येत आहेत व त्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मलेशिया, फिलीपाईन्स, अमेरिका, ब्राझीलसारख्या विकसित देशांचे कृषिप्रक्रियायुक्त पदार्थ ग्राहकांना आकर्षित करुन घेत आहेत. त्यामुळं राज्यात देखील कृषी प्रक्रिया उद्योगांची गरज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : जिल्हानिहाय पिकांची प्रतवारी करा, प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडं मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Embed widget