Ravikant Tupkar : शेतकरी पुत्रांनो नेत्यांच्या गाड्या आडवा, सोयाबीन कापसाच्या दराचा जाब विचारा : रविकांत तुपकर
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.
Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. विदर्भातील नगदी पीक असलेले सोयाबीन आणि कापूस या पिकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. या मुद्यावरुन रविकांत तुपकर हे संपूर्ण विदर्भाचा दौरा करत आहेत. शेतकरी पुत्रांनो नेत्यांच्या गाड्या अडवून सोयाबीन कापसाचा दराचा जाब विचारा असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलं आहे.
विदर्भातील नगदी पीक असलेले सोयाबीन आणि कापूस या पिकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे संपूर्ण विदर्भाचा दौरा करत आहेत. त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन केलं आहे. शेतकरी पुत्रांना गावात येणाऱ्या नेत्यांच्या गाड्या अडवून सोयाबीन आणि कपाशीला भाव देण्याची मागणी लावून धरावी असे रविकांत तुपकर म्हणाले.
राज्यात अफू लावायची परवानगी द्या
मध्यप्रदेशमध्ये अफू लावण्यास परवानगी आहे आणि इतर राज्यातही अफूसाठी काही प्लॉट देण्यात येतात. अफू औषधासाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशीला शासन भाव देत नाही. त्यामुळं शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. किमान अफू लावायची परवानगी तरी द्या असे रविकांत तुपकर म्हणाले.
मंत्री आणि विमा कंपन्या यांची मिलीभगत
पिकविमा कंपनी विमा काढताना हजारो कोटी जमा करते. देताना शेकडो रुपये देतात. सरकारचा या विमा कंपन्यांना आशीर्वाद आहे. मागील दहा वर्षाचा या विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट केलं तर राफेल पेक्षाही मोठा घोटाळा या विमा कंपनीतून बाहेर येऊ शकतो असे रविकांत तुपकर म्हणाले. मात्र, राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांची विमा कंपन्यांची मिली भगत असल्याचा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.
1 नोव्हेंबरपासून तुपकरांची एल्गार यात्रा
रविकांत तुपकर हे 1 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत एल्गार यात्रा काढणार आहेत. शेगाव येथून या एल्गार यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. या 20 दिवसात तुपकर हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना एकत्र करणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विदर्भातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका निच्यांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. या विरोधात तुपकर अराजकीय आंदोलन उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी तुपकर मैदानात, 1 नोव्हेंबरपासून काढणार 'एल्गार यात्रा'