(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी तुपकर मैदानात, 1 नोव्हेंबरपासून काढणार 'एल्गार यात्रा'
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहे.
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहे. तुपकर हे 1 नोव्हेंबरपासून शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार आहे. 20 नोव्हेंबरला बुलढाणा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका रविकांत तुपकरांनी केलीय.
रविकांत तुपकर हे 1 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत एल्गार यात्रा काढणार आहेत. शेगाव येथून या एल्गार यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. या 20 दिवसात तुपकर हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना एकत्र करणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विदर्भातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका निच्यांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. या विरोधात तुपकर अराजकीय आंदोलन उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, रविकांत तुपकर हे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
25 ते 31 ऑक्टोबर पर्यंत रविकांत तुपकर ठिकठिकाणी घेणार बैठका
सोयाबीन आणि कापूस दरवाढ, यलो मोझ्याक, बोंडअळी नुकसान भरपाई, पिकविमा यासह अन्य न्याय मागण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, 25 ते 31 ऑक्टोबर पर्यंत रविकांत तुपकर हे सोयाबीन आणि कापूस पट्ट्यात ठिक-ठिकाणी सोयाबीन -कापूस परिषदा आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेवून जनजागृती करणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून ते शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेवून एल्गार रथयात्रेला सुरुवात करणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी एल्गार रथ यात्रेचा समारोप हा एल्गार महामोर्चात होणार असून बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार (व्यापारी संकुल) येथून एल्गार महामोर्चाला सुरुवात होणार आहे. आपल्या हक्कासाठी आपल्याला तीव्र असा लढा द्यायचा आहे. सरकारला शेतकरी आणि तरुणांची ताकद दाखवून द्यायची वेळ आली असल्याचे तुपकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: