एक्स्प्लोर

Grapes : द्राक्षाचे नवीन 'लाल' रंगाचे सुगंधी वाण विकसित, मांजरीच्या प्रयोगशाळेत संशोधन; उत्पादनात वाढ होणार  

New Grapes Variety : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघानं द्राक्षाचे नवीन वाण (New Grape Variety) विकसित केलं आहे.

New Grapes Variety : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघानं द्राक्षाचे नवीन वाण (New Grape Variety) विकसित केलं आहे. पुण्यातील मांजरीच्या (Pune Manjari) फार्म प्रयोगशाळेत हे नवे द्राक्ष वाण विकसित केले आहे. विकसीत करण्यात आलेले नवीन वाण हे सुगंधी लाल रंगाचे आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या वाणाच्या संशोधनाचं काम सुरु होतं. चालू हंगामात हा द्राक्ष वाणाचा प्लॉट काढणीला आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी (Demand in international markets) लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, उत्कृष्ट चव, वजन आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघास यश आलं आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरण परिस्थितीत या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशानं मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी सदर वाणाची काही रोपे देण्यात आली होती. भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना चाचणी आणि अभ्यासासाठी नव्या वाणाची काही रोपे देण्यात आली होती. त्या सर्व प्लॉट्सवर या वाणाबाबत समाधानकारक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. या चाचणी दरम्यान प्राप्त झालेल्या अभिप्राय आणि सूचनांचा अभ्यास करून या वाणात अजून काही सुधारणांची शक्यता तपासली जाणार आहे.

आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना परदेशात मोठी मागणी 

देशात द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा एकछत्री अंमल असून आकर्षक रंग आणि मधुर चवीच्या द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 98 टक्के आहे. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल असा विश्वास महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केला.

मांजरीसह नाशिमकमधील तळेगाव वणी इथही नवीन प्लॉट

महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघ सातत्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. तसेच अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकासनासाठी जागरूकपणे कार्य करत आहे. आता नव्याने विकसित करण्यात आलेले वाण हे सध्याच्या क्रिमसन जातीपेक्षाही सुधारित आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बाजारपेठेत देखील याला चांगला दर मिळणार आहे. मांजरी फार्म प्रयोगशाळेसोबतच तळेगाव वणी (जि. नाशिक) येथील प्रक्षेत्रावर सुमारे एक हजार झाडांचा प्लॉट उभारण्यात आला आहे. पुढील हंगामात सदर प्लॉटवर फळधारणा होणे अपेक्षित असल्याचे शिवाजीराव पवार म्हणाले.

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठी वाढ होणार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार चांगल्या रंग, चव, वजनाची आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती द्राक्ष बागाईतदार संघाने विकसित केली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. सदर प्रजातीचे नामकरण करुन लवकरच द्राक्ष बागाईतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळं निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात मोठी वाढ होणार असून त्यातून द्राक्ष बागाईतदारांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे मध्यवर्ती विज्ञान समिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांनी सांगितले.

 महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येणार

गेल्या चार वर्षांपासून सदर द्राक्ष प्रजातीची काही रोपे आमच्या प्लॉटवर चाचणीसाठी आणली होती. या प्रजातीच्या झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर फळधारणा झाली. या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती 'क्रीमसन' प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. सदर झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल, अशी माहिती उरुळी कांचनचे  प्रयोगशील शेतकरी अभिषेक कांचन यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Grapes Farmers : द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा पुढाकार, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयोग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget