एक्स्प्लोर

Maize Export : देशातून मका निर्यातीत मोठी वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या (Maize) मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भारतातून होणारी मका निर्यात (Maize Export) देखील वाढली आहे.

Maize Export : आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या  (Maize) मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातून होणारी मका निर्यात (Maize Export) देखील वाढली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2022-23 मध्ये मकेच्या निर्यात 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षात 6 हजार 507 कोटी रुपयांच्या मका निर्यात झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. 

निर्यातीसाठी मक्याचे दर दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपये

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार 300 रुपयांचा दर मिळत आहे. तर निर्यातीसाठी मक्याचे दर हे दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या भारताला आग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागत आहे. त्यामुळे या देशांनी मका निर्यात वाढवली आहे. 

'या' देशातील मका उत्पादनात घट 

यावर्षी जगातील काही प्रमुख मका उत्पादक देशातील उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी दरात चांगली वाढ होत असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. यंदा अमेरिका, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटलं आहे. अमेरिकेतील उत्पादन यंदा 411 लाख टनाने मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातही चांगली वाढ झाली आहे. सोयापेंड आणि इतर पेंडेचे दर सध्या काहीसे अधिक आहेत. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होत आहे. सध्या भारतातील रब्बीतील मका पिकाची स्थिती देखील चांगली आहे. मात्र निर्यातही वाढत आहे. सध्या निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याने मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. 

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मका पुरवठा साखळी विस्कळीत

यावर्षी जागतिक मका उत्पादन मोठी घट झाली आहे. पाट टक्क्यांच्या आसपास मकेचे उत्पादन यावर्षी कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील मका उत्पादन 11 हजार 513 लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या हंगामातील उत्पादन 12 हजार 160 लाख टन होते. त्यातच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मका पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : इंजिनियर युवकाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार, थेट बांधावर जाऊन मकेची खरेदी, शेतकऱ्यांना मिळतोय फायदा

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Embed widget