एक्स्प्लोर

Agriculture News: पुणे जिल्ह्यातील  2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ

Panjabrao deshmukh interest subsidy scheme : पुणे जिल्ह्यातील  2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे.

Panjabrao deshmukh interest subsidy scheme : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr. Panjabrao deshmukh interest subsidy scheme) लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात पुणे (Pune) जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा करण्यात आले आहेत.

तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते. तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 60 हजार 254 शेतकऱ्यांना 12 कोटी 91 लाख 69 हजार 939 रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून 2 लाख 28 हजार 663 शेतकऱ्यांना 44 कोटी 40 लाख 7 हजार 86 रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मुदतीत परतफेड

यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक कृषी निविष्ठा, बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करत आहेत. त्यामुळं बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होम्यास मदत होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सवलत, 34 हजार 856 कोटी रुपयांची तरतूद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :23 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; काय निर्णय घेणार?Maharashtra Chitrarath : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :23 डिसेंबर 2024: ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवं असतं, कारण....; संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका
गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवं असतं, कारण....; संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
Embed widget