IPL 2022: गुजरातविरुद्ध सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनची बॅट तळपली; सर्वात जलद अर्धशतक ठोकून वेधलं सर्वांचं लक्ष
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना पंजाब आणि गुजरात यांच्यात खेळला जात आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना पंजाब आणि गुजरात यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या रोमांचक सामन्यात पंजाबचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने मोठी कामगिरी केली आहे. या सामन्यात त्यानं 237 च्या स्ट्राईकनं फलंदाजी करत सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत समावेश केला आहे. या कामगिरीमुळं सोशल मीडियावर लिव्हिंगस्टोनवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गुजरातविरुद्ध लिव्हिंगस्टोनने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं गुजरातविरुद्ध 27 चेंडूत 64 धावांची खेळी खेळली होती. ज्यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. या हंगामात सर्वात वेगवान धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कमिन्सच्या नावावर आहे. त्यानं मुंबईविरुद्ध सामन्यात अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक केलं. ज्यामुळं कोलकात्याच्या संघाला मुंबईवर विजय मिळवता आला.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध गुजरात यांच्यात खेळला जात आहे. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढत आहेत. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून गुजरात समोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
संघ-
पंजाबचा संघ-
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
गुजरातचा संघ-
मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.
हे देखील वाचा-