(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yuzvendra Chahal : चहलच्या ज्या फोटोवर तयार झाले होते मीम्स, त्याच स्टाईलमध्ये केलं हॅट्रिकचं सेलिब्रेशन, पाहा Video
IPL मध्ये पार पडलेल्या सोमवारच्या सामन्यात यंदाच्या सीजनमधील पहिली-वहिली हॅट्रिक राजस्थान संघाकडून युझवेंद्र चहल याने घेतली. त्याने या कामगिरीनंतर केलेलं सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं.
RR Vs KKR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) सोमवार रात्री एका अत्यंत रोमहर्षक सामन्याचे अनेकजण साक्षीदार झाले. राजस्थानच्या भव्य अशा 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 210 धावा करु शकला अवघ्या सात धावांनी त्यांचा पराभव झाला. दरम्यान या चुरशीच्या सामन्यात राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला राजस्थानचा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). चहलने सामन्यात एक दमदार अशी हॅट्रिक घेतली. त्याने सर्व महत्त्वाच्या खेळाडूंचे विकेट्स यावेळी घेतले. दरम्यान त्याच्या या हॅट्रिकनंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशननेही सर्वांचच लक्ष वेधलं. चहलने हॅट्रिक घेतल्यानंतर एक खास सेलिब्रेशन केलं. त्याने मैदानात एका विशेष स्टाईलमध्ये बसला, ही तीच स्टाईल आहे ज्या स्टाईलमध्ये चहलचा फोटो काही वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता.
2019 सालच्या विश्वचषकात भारताचा सामना सुरु असताना चहल सीमारेषेपलीकडे अतिरिक्त खेळाडू म्हणून बसला असताना अगदी निवांत स्टाईलमध्ये बसला होता. ज्यानंतर त्याच्या या फोटोचे अनेक मीम्स तयार झाले होते. पण आता एक दमदार हॅट्रिक चहलने घेतल्यानंतर तिच स्टाईल त्याने थेट मैदानात मारत सर्व मीम्स तयार करणाऱ्यांना हटके उत्तर दिलं. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट्स करत हा फोटो शेअरही करत आहेत.
अशी पडली चहलची ओव्हर
राजस्थानच्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 16 व्या ओव्हरपर्यंत केकेआरने 4 विकेट्स गमावत 178 रन केले होते. ज्यामुळे त्यानंतर केकेआरला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये केवळ 40 धावांची गरज होती. त्यांच्या हातात 6 विकेट्सही होते. पण तेव्हाच राजस्थानने हुकूमी एक्का चहलल ओव्हर दिली. चहलने पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यरला (6) संजूच्या मदतीने स्टपिंगने बाद केलं. पुढील दोन चेंडूत त्याने एक धाव दिली. ज्यानंतर त्याने एक वाईड बॉल फेकला. पण चौथ्याच चेंडूवर चहलने श्रेयसला पायचीत केल. नंतर पाचव्या चेंडूवरक शिवम मावीला झेलबाद करवलं आणि अखेरच्या सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्सलाही बाद करत हॅट्रिक नावावर केली.
केकेआरचा सात धावांनी पराभव
राजस्थानच्या लक्ष्यानं दिलेल्या 218 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवर सुनील नारायण रनआऊट झाला. त्यानंतर सलामीवीर आरोन फिंच आणि श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. आरोन फिंचनं 58 तर, श्रेयस अय्यरनं 85 धावांची तुफानी खेळी केली. आरोन फिंच आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेरच्या दोन षटकात उमेश यादवनं दोन षटकार मारून कोलकात्याच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, त्यालाही संघाला विजय मिळवता आला नाही. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- Natasa Stankovic Pic Viral: हार्दिकची पत्नी नताशाच्या सेल्फीनं सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो