CSK vs PBKS: ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, 'या' गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
आयपीएल 2022 चा 11 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य दिले आहे.
![CSK vs PBKS: ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, 'या' गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे csk-vs-pbks-dwayne-bravo-4th-bowler-most-wickets-against-punjab-kings-record-ipl-2022 CSK vs PBKS: ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, 'या' गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/03/260e76ed2bda1e9e638c4af38afbab25_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
आयपीएल 2022 चा 11 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे लक्ष दिले आहे. लिव्हिंगस्टोनने पंजाबकडून शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस जॉर्डनने 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान ड्वेन ब्राव्होच्या नावावर एका नवा विक्रमाची नोंद झाली आहे. या विक्रमात त्याने भुवनेश्वर कुमारला मागे सोडले.
पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ब्राव्हो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात त्याने 3 षटकात 32 धावा देत एक विकेट घेतली. या विकेटच्या मदतीने त्याने भुवनेश्वरला मागे टाकले आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत. तर ब्राव्होने 24 विकेट घेतल्या आहेत. उमेश यादव या बाबतीत आघाडीवर आहेत.
पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या उमेशच्या नावावर आहे. त्याने 33 विकेट घेतल्या आहेत. तर सुनील नरेन 32 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. युजवेंद्र चहल या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 25 विकेट घेतल्या आहेत. चहल के, ब्राव्हो चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ब्राव्होने नुकताच लसिथ मलिंगाचाही विक्रम मोडीत काढला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
संबंधित बातम्या:
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
- CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाबला दुसरा झटका, राजपक्षे 9 धावा करून बाद
- SRH vs RR : राजस्थान-हैदराबाद सामन्यात चहलची पत्नी धनश्रीने वेधलं साऱ्यांचं लक्ष, उत्साहात करत होती राजस्थानला चिअर
- IPL : आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा 'या' फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?
- IPL 2022, GT vs DC : गिल-फर्गुसन विजयाचे शिल्पकार, दिल्लीचा 14 धावांनी पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)