Rahul Dravid: आठ महिन्यांत सहा कर्णधारांसोबत काम; राहुल द्रविडनं सांगितला अनुभव
Rahul Dravid: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भारत आणि दक्षिण (IND vs SA) आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका पार पडली.
Rahul Dravid: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पावसामुळं रद्द झाल्यानं ही मालिका 2-2 अशी बरोबरी सुटली. विशेष म्हणजे, एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मालिका खेळल्या जात असल्यानं गेल्या आठ महिन्यात सहा खेळाडूंनी भारताचं कर्णधारपद भुषावलंय. या वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करण्याचा यावर राहुल द्रविडचा अनुभव कसा होता? यावर स्वत: राहुल द्रविडनं भाष्य केलंय.
वेगवेगळ्या कर्णधारसोबत काम करणं आव्हानात्मक
भारतीय संघानं गेल्या आठ महिन्यात तिन्ही फॉरमेट मिळून सहा कर्णधार बदलले आहेत. या कर्णधाराच्या यादीत शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांचा यात समावेश आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. यामुळं आता या यादीत हार्दिकचंही नाव जोडलं जाईल. या वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करण्याबद्दलच्या अनुभवाबाबत राहुल द्रविड म्हणाला की, "भारतानं गेल्या आठ महिन्यात सहा कर्णधार बदलले आहेत. जेव्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली, तेव्हा आमचं असं काही नियोजन ठरलं नव्हतं. परंतु, भारत खेळत असलेल्या सामन्यांची संख्या पाहता, ही अधिक महत्वाचं ठरतं. तुम्हाला वेळोवेळी निर्णयाचा स्वीकार करावा लागतो. वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करणे आव्हानात्मक होतं."
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आयर्लंडशी भिडणार
दरम्यान, हार्दिक पांडयाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडशी दोन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. ज्यामुळं आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनं हार्दिक पांड्याकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. आयपीएलमधील कामगिरीनंतर आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या हार्दिक पांड्याला रोहित शर्मानंतर भारतीय टी-20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिलं जातंय.
हे देखील वाचा-