IND vs SA T20: अखेरचा टी-20 सामना रद्द झाल्यामुळं कर्णधार ऋषभ पंत निराश
IND vs SA T20: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान, अखेरचा आणि निर्णायक सामना रद्द झाल्यानं मालिका 2-2 नं बरोबरीत सुटली.
IND vs SA T20: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान, अखेरचा आणि निर्णायक सामना रद्द झाल्यानं मालिका 2-2 नं बरोबरीत सुटली. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करत असलेल्या केशव महाराजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं हा सामना 3.3 षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारतीय संघानं दोन विकेट्सच्या नुकसानावर 28 धावा केल्या. परंतु, पाऊस थांबायचं नाव घेत नसल्यानं अखेर हा सामना रद्द करण्यात आला. पाचवा टी-20 सामना रद्द झाल्यानं कर्णधार ऋषभ पंतनं (Rishabh Pant) नाराजी व्यक्त केलीय.
ट्वीट-
मी माझं 100 टक्के दिलं
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसामुळं शेवटचा टी-20 सामना पूर्ण न झाल्याने भारतीय कर्णधार ऋषभ पंत कमालीचा निराश झालाय. ऋषभ पंत म्हणाला की "हा सामना होऊ न शकल्याने मी नक्कीच निराश आहे. परंतु या मालिकेतून बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत. सुरुवातीला मालिकेत 0-2 नं पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघानं कमालीचे पुनरागमन केले. एक संघ म्हणून आम्ही सध्या अशा स्थितीत आहोत, जिथे आम्ही विजयासाठी वेगवेगळ्या मार्गांच्या शोधात आहोत.मी नेहमीच मैदानावर जाऊन माझे 100 टक्के देण्यासाठी प्रयत्नशील असतो", असंही ऋषभ म्हणाला.
नाणंफेक जिंकणं माझ्या नियंत्रणात नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतनं एकदाही नाणफेक जिंकलं नाही. यामुळं त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं. यावर बोलताना ऋषभ पंत म्हणाला की, पहिल्यांदाच असं घडलंय की, मी इतके नाणेफेक गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे, पण ते माझ्या नियंत्रणात नाही, असंही ऋषभ पंतनं म्हटलंय. याशिवाय, इंग्लंड दौऱ्यावरही ऋषभ पंतनं भाष्य केलंय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, असंही अश्वासन त्यानं दिलंय. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी निराशाजनक होती. त्यानंतर सुनील गावस्करसह अनेक माजी खेळाडूंनी ऋषभ पंतच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.
हे देखील वाचा-