(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तारक मेहता'मधील नत्तूकाकांना कर्करोगाचं निदान; म्हणाले, 'मी अखेरपर्यंत काम करत राहीन'
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील नत्तूकाकांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक (Ghnshyam Nayak) यांना कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे ते आता यापुढे काम करणार का याबद्दल चर्चा सुरु आहे.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका तुफान गाजली. ती केवळ गाजलीच नाही तर अनेक वर्षं ती चालू आहे. सकारात्मक गोष्टी सांगत राहणं हे त्या मालिकेचं काम. म्हणून या मालिकेतले जेठालाल, भिडे, दयाबेन, नत्तूकाकापासून सगळ्या व्यक्तिरेखा गाजल्या. त्यावर लोक प्रेम करतात. सध्या नत्तू काका पुन्हा चर्चेत आले आहेत. ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांना कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आणखी किती काळ ते ही मालिका करू शकतील याबद्दल शंका वर्तवल्या जात असतानाच घनश्याम यांनी या सगळ्या गोष्टींवर भाष्य करून विराम दिला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून नत्तूकाका दिसले. घनश्याम नायक हे अभिनेते मनोरंजनसृष्टीला नवे नाहीत. त्यांनी अनेक मालिकांमधून काम केलं आहे. यात हम दिल दे चुके सनम, लज्जा, खाकी, चायना गेट अशा सिनेमात काम केलं आहे. कर्करोबद्दल बोलताना घनश्याम यांच्या मुलाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण त्याचवेळी सध्या काळजीचं कारण नसून घनश्याम काम करू शकत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. घनश्याम यांनीही ही बाब अत्यंत सकारातम्क पद्धतीने घेतली आहे. ते म्हणाले, मला काहीही होणारं नाही. मी 100 वर्ष जगणार आहे. सध्या ज्येष्ठ कलावंतांना चित्रिकरण करू दिलं जात नाही. कोव्हिड होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. महाराष्ट्राबाहेर काही चित्रिकरणं चालू आहेत. तिथे ज्येष्ठ कलाकारांना शक्यतो नेलं जात नाहीय. पण ही वेळही टळेल. पुन्हा चित्रिकरण होईल. त्यावेळी मला या चित्रिकरणात भाग घ्यायचा आहे.
सध्या नत्तू काकांवर उपचार सुरू झाले आहेत. काही दिवसांनी त्यांच्यावर केमो थेरपीही केली जाणार आहे. सध्या त्यांच्यावर औषधोपचार चालू असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टर सांगतात. या वृत्ताने तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. लवकरात लवकर ही सगळी परिस्थिती निवळून नेहमीप्रमाणे चित्रिकरण चालू व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो आहे. त्यानंतर नत्तू काकांचं जोरदार स्वागत सेटवर होईल असंही कळतं.
जेठालालला वाटतात चंपकचाचा गूढ
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारली ती अमित भट्ट यांनी. या सगळ्याच कलाकारांचा आता एकमेकाशी घरोबा झाला आहे. जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांना मात्र पडद्यावरचे आपले वडील चंपक चाचा हे गूढ वाटतात. दिलीप याबद्दल बोलताना म्हणाले, मी आणि अमित अनेक वर्षं एकमेकांसोबत काम करतो आहोत. आम्ही केवळ मालिकाच नव्हे, तर आम्ही एकत्र नाटकंही केली आहेत. त्यावेळीही अमित यांच्यासोबत काम करताना मजा तर येते. पण मला ते गूढ वाटतात.
महत्वाच्या बातम्या :
- Reliance AGM 2021 : स्वस्त 5G स्मार्टफोन, JioBook लॅपटॉप आणि बऱ्याच अपेक्षा; रिलायन्सचे घसरलेले शेअर्स वधारणार?
- Reliance AGM 2021 : आज होणार धमाका! रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी करु शकतात 'या' घोषणा
- मास्कचा गैरवापर करत पत्नीची मालमत्ता हडपली, महिलेच्या मदतीने बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी स्वत:च्या नावावर